Bigg Boss 14 : ‘यापुढं अशी चूक होणार नाही, मराठी माणसांची माफी मागतो’, गायक कुमार सानूचा मुलगा ‘जान’चा माफीनामा (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कलर्स वाहिनीवर सुरु असलेले (Colors TV) ‘बिग बॉस’चे १४ वे पर्व (Bigg Boss १४) एका नवीन वादामुळे चर्चेत आले होते. घरातील स्पर्धक आणि प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूने ‘मला मराठीची चीड येते’, असे म्हणत ‘मराठी’ भाषेचा अपमान केला होता. यानंतर जानवर सर्व स्तरातून टीका होत होती. मनसेने जानला माफी मागणीसाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर बिग बॉस या कार्यक्रमात जानला त्याच्या चुकीची जाणीव करुन देत त्यास नॅशनल टेलिव्हिजन वर माफी मागावी लागली आहे. ‘मराठी लोकांची माफी मागून यापुढे अशी चूक करणार नाही,’ अशी ग्वाही जानने दिली आहे.

जान कुमार सानू बोलताना म्हणाला, मी नकळत एक चूक केली ज्याने मराठी माणसाच्या भावनाला धक्का बसला, मराठी माणसांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी यासाठी माफी मागतो. तसेच इथून पुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही, असे त्याने म्हटले.

काय आहे प्रकरण ?

बिग बॉसच्या १४ व्या हंगामात शोमधील स्पर्धक जान कुमार सानू आणि निक्की तांबोळी यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर निक्की तांबोळी आणि राहुल वैद्य मराठी भाषेत चर्चा करत होते. तेव्हा जानने त्यास विरोध दर्शवत, ‘मला मराठी भाषेची चीड येते हिंमत असेल तर हिंदीत बोला,’ असे म्हटले होते. यावरुन मनसेने २४ तासांत जान कुमार सानूने माफी मागितली नाहीतर बिग बॉसचे शूट बंद करु तसेच जान सानुला यापुढे काम कसे मिळते ते पाहू, असा इशारा दिला होता. सानुला लवकरच थोबडवणार, अशी धमकी मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी दिली होती.

वाद वाढत असतानाच कलर्स वाहिनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इंग्रजीत पत्र पाठवून माफी मागिलती होती. तर मराठी भाषेसंदर्भातल्या विधानामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही माफी मागतो. आम्ही मराठी प्रेक्षकांचा आदर करतो. भारतातल्या सगळ्याच भाषांचा आम्ही सन्मान करतो, असे कर्लसने मराठी भाषेत राज ठाकरे यांना पत्र पाठवले होते.

You might also like