#Video : ‘बिग बॉस’नंतर लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची व्यक्‍त केली ‘ही’ इच्छा !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम – ‘बिग बॉस सिझन – २ मराठी’ मध्ये सहा आठवडे घालविल्यानंतर आता लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मोहोळ किंवा पुणे शहरातील कुठल्याही एका विधानसभा मतदारसंघातून चांगल्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची मनीषा असल्याचे त्यांनी सांगितले आहे मात्र त्यासाठी त्यांनी लावणी जर अमेरिकेत जाऊ शकते तर विधानसभेत का नाही असा सवालही उपस्थित केला आहे.

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा ‘बिग बॉस सिझन -२’ मधील प्रवास संपला आहे. बिग बॉसच्या घरात त्यांनी सहा आठवडे घालवले होते. या काळात चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. बिग बॉस चे हे घर म्हणजे भांडण तंटे आणि ताणतणाव असलेले घर आहे. या तणावामुळेच मी माझ्यातली क्षमता जास्त दाखवू शकली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. बिग बॉसच्या घरात राहताना मला माझी शेक्षणिक पार्श्वभूमी फार नसल्याची खंत वाटली. मात्र, माझे व्यावहारिक ज्ञान चांगले असल्याने मी एवढे दिवस घरात राहू शकले. एरवी प्रेक्षकांनी मला पूर्ण मेकअपमध्ये पाहिले आहे.

पण, बिग बॉसच्या घरात मी मेकअपवीना प्रेक्षकांच्या समोर आले. त्यामुळे आता ते मला मेकअपशिवायही ओळखायला लागले आहेत. घरात ताणतणाव जरी असला, तरीही त्यातून बरंच काही शिकायला मिळालं. आता बाहेर आल्यावर पुन्हा लावणी कार्यक्रमांकडे वळणार असल्याचे त्या म्हणाल्या.

आरोग्यविषयक वृत्त

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

टक्कल पडलेय ? करा हा उपाय, अन्य आजारही होतील दूर

चिकूमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, हाडेसुद्धा होतात मजबूत

बदामापेक्षा प्रभावशाली फुटाणे, रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ फायदे

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होतात ‘हे’ आजार, अशी घ्या काळजी

वजन पुन्हा वाढू नये यासाठी करा ‘हे’ साधे उपाय