Pune बिग ब्रेकिंग : अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून पुण्यातील इतर सर्व दुकाने बंद – मनपा आयुक्त विक्रम कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुभाव शहरात झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, राज्य सरकारने संपुर्ण राज्यात कडक निर्बंध लावण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. दरम्यान, पुण्यातील अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. त्याबाबत राज्य शासनाकडून आदेश काढण्यात आले आहेत. याबबात पोलीसनामा ऑनलाइनने पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे आणि उद्यापासून पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळून) 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचे सांगितले आहे.

जाणून घ्या सविस्तर माहिती –
कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरात मंगळवारपासून ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. अत्यावश्यक वस्तुंची दुकानेही सकाळी ६ ते संध्याकाळी ७ या वेळेतच सुरू राहाणार आहेत. या दुकानदारांनीही कोरोना सुरक्षिततेशी संबधित सर्व नियमांचे पालन करावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये राज्यात मोठ्याप्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. एकट्या पुणे शहरात दररोज पाच हजारांच्या आसपास रुग्ण आढळत असून ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ४५ हजारांपर्यंत पोहोचली आहे. तसेच ऑक्सीजन व व्हेंटीलेटरची गरज असलेले रुग्णही मोठ्यासंख्येने समोर येत असून बेडस्ची कमतरता जाणवू लागली आहे. याहून भयानक परिस्थिती ओढवू नये यासाठी लॉकडाउन हा एकमेव पर्याय शासनासमोर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच मागील शुक्रवारी पालकमंत्री तथा उपुमख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये रात्री ६ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी तर सकाळी ६ ते रात्री ६ जमावबंदी जाहीर करण्यात आली. तसेच पीएमपी बसेससोबतच हॉटेल्स, मॉल्स, सिनेमागृह, स्विमिंट टँक, जीम्स, उद्याने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, रविवारी नवीन रुग्णसंख्या मृत्यूदर वाढल्याने राज्य शासनाने राज्यात ३० एप्रिल पर्यंत नवीन निर्बंध जाहीर केले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

‘या’ अत्यावश्यक सेवा सुरू राहातील
*
रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्निनीक, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसीस्ट व फार्मासिटीकल कंपनी व सर्व प्रकारची आरोग्य सेवा.

* किराणा, भाजीपाला, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थाची दुकाने.

* सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक बस, टॅक्सी, रिक्षा आणि रेल्वे.

* वेगवेगळ्या देशांचे राजदूत व त्यांची कार्यालये.

* पूर्व पावसाळी नियाजित कामे.

* स्थानीक प्राधीकरणाद्वारे पुरविण्यात येणार्‍या सार्वजनिक सेवा.

* मालवाहतूक

* कृषी संबधित सेवा

* ई कॉमर्स

* वृत्तपत्र (मान्यताप्राप्त मिडिया)

* आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाद्वो घोषित केलेल्या अत्यावश्यक सेवा.

* सर्व उद्याने संध्याकाळी ६ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहातील.

* रिक्षा मध्ये चालक व दोन व्यक्तींना प्रवासाची मुभा

* टॅक्सी, कॅब, चारचाकी वाहनामध्ये वाहन चालक आणि आरटीओ द्वारे निर्गमित केलेल्या आसन व्यवस्थेच्या ५० टक्के आसन क्षमता.

* प्रवासादरम्यान मास्कचा वापर न केल्यास ५०० रुपये दंड.

* सार्वजनिक वाहतूक करणारे वाहन चालक व कर्मचार्‍यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेणे. तोपर्यंत १५ दिवासंची वैधता असणारे कोव्हिड १९ ची आरटीपीसीआर तपासणी केलेले सर्टिफिकेट सोबत बाळगावे. हे सर्टिफिकेट नसल्यास १ हजार रुपये दंड आकारणार.

* पीएमपीएमल क्षेत्रघातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात पीएमपीएमएल वगळता सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा ९ एप्रिल पर्यंत संपुर्णत: बंद राहाणार.

खाजगी कार्यालये
सहकारी, को ऑपरेटीव्ह, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका, बीएसई/ एनएसई, वीज कंपनी, दूरसंचार सेवा पुरवठादार, विमा, मेडीक्लेम कंपनी, औषध उत्पादक व संबधित कंपन्यांची कार्यालये, आयटी सर्वर व अत्यावश्यक सुविधा पुरविणारी कार्यालये, वकील, सी.ए.यांची कार्यालये, वित्तीय संस्थेशी संबधित कार्यालये वगळता सर्व कार्यालये बंद राहाणार आहेत. सर्व शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितीत सुरू राहातील. मात्र, कोव्हिड १९ संबधित काम करणार्‍या सर्व आस्थापना १०० टक्के क्षमतेने सुरू राहाणार.

वर्तमान पत्रे, साप्ताहिके, नियतकालिके छपाई व वितरणास परवानगी
वर्तमान पत्रांचे घरोघरी वितरणास सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत परवानगी राहील. वृत्तपत्र व्यवसायात काम करणार्‍यांनी कोव्हीड १९ ची आरटीपीसीआर चाचणी केलेले किमान १५ दिवस वैधतेचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहाणार आहे. १० एप्रिलपासून प्रमाणपत्र तपासणी करण्यात येईल. वृत्तपत्र व्यवसायात काम करणार्‍यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मागीलवर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर वृत्तपत्रामुळे कोरोना पसरतो, अशी अफवा पसरविण्यात आली होती. मात्र, तज्ञांनी वृत्तपत्रामुळे कोरोना पसरत नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर कोरोनाच्या काळात सर्वाधीक विश्‍वासार्ह माहिती पोहोचवणारे माध्यम म्हणूनही तज्ञांनी दुजोरा दिला होता. वितरण सेवेत काम करणार्‍यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

१० वी व १२ वीच्या परिक्षा नियोजीत वेळापत्रका प्रमाणे होतील.
एप्रिलमध्ये होणार्‍या १० वी व १२ वीच्या परिक्षा नियोजीत वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत. मात्र, याठिकाणी शिक्षक व कर्मचार्‍यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली असावी अथवा ४८ तासांची वैधता असलेली आरटीपीसीआर कोरोना चाचणी केलेली असणे बंधनकारक राहाणार आहे. परिक्षेच्या ठिकाणी सर्वांना मास्क आणि सॅनिटायजरची व्यवस्था करणे अनिवार्य राहाणार आहे. या व्यतिरिक्त ऑनलाईन शिक्षण वगळता सर्व शैक्षणिक आस्थापना, कोचिंग क्लासेस बंद राहाणार आहेत.

उत्पादन क्षेत्र पुर्ण क्षमतेने सुरू राहील.
सर्व कंपन्या पुर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याठिकाणी सुरक्षिततेशी संबधित सर्व उपाययोजना करणे आवश्यक राहाणार आहे. कंपनीच्या गेटवरच कर्मचार्‍यांची पल्स ऑक्सीमीटर व थर्मोमीटरने तपासणी करूनच प्रवेश द्यावा. कर्मचारी कोव्हीड पॉझीटीव्ह आढळल्यास त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांचे स्वखर्चाने विलगीकरण करण्यात यावे. ५०० पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांनी स्वत:चे विलगीकरण कक्ष सुरू करावेत. कॉमन टॉयलेट सॅनिटायीज करावेत. ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगार राहाण्याची सुविधा आहे, ती बांधकामे सुरू ठेवता येणार आहेत.

shopa

 

दुकाने, मार्केट आणि मॉल
सर्व दुकाने, मार्केट आणि मॉल हे संपुर्ण दिवस बंद राहणार आहेत. (अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू वगळून)

अ) जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडी राहतील पण सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागले.

ब) जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांच्या मालकांनी आणि कामगारांनी लवकरात लवकर कोविड-19 ची लस घ्यावी. ग्राहकांसोबत सोशल अंतर बाळगूनच बोलावे तसेच दुकान मालक आणि कामगारांनी फेसशिल्डचा वापर करावा.

क) बंद असलेल्या सर्व दुकान मालकांनी त्यांच्यासोबत असणार्‍या कामगारांचे कोविड-19 लसीकरण करावे.