खुशखबर ! सोन्याच्या दरात प्रचंड ‘घसरण’, प्रति 10 ग्रॅम 1950 रूपयांची ‘घट’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. सोन्याचे भावही उतरले आहेत. याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत चालला आहे. गेल्या 10 दिवसांबद्दल बोलायचं झालं तर सोन्याच्या दरात 5,000 रुपयांची घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. प्रति 10 ग्रॅमसाठी सोन्याचा भाव 39,661 रुपये एवढा झाला आहे. 10 ग्रॅम सोन्याचे दर 1949 रुपयांनी घसरले आहे त्यामुळे सोन्याचा प्रति 10 ग्रॅमसाठीचा दर हा 39,661 रुपये एवढा झाला आहे. चांदीच्या दराबद्दल बोलायचं झालं तर चांदीचा दर प्रति किलो 6445 रुपयांनी घसरला आहे.

सोमवारी दिल्लीत सोन्याचा दर 455 रुपयांनी वाढून 41,610 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. चांदीबद्दल सांगायचं झालं तर चांदीच्या दरात1283 रुपयांनी घसरण होऊन चांदी 40304 रुपये किलो झाली होती. शुक्रवारी सोन्याचे दर 42,017 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा सर्वच क्षेत्रांवर परिणाम होताना दिसत आहे. सोन्याच्या भावावर याचा मोठा परिणाम झाल्यानं सोन्या-चांदीच्या दरात मोठी घरसण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 13 मार्च 2020 रोजी देखील सोन्याच्या भावात घट झाली होती. सोन्याचा भाव त्या दिवशी 41556 रुपयांवर आला होता.