कोरोना काळात रखडले ‘हे’ 7 सिनेमे, बॉलिवूडचे इतके कोटी आले धोक्यात

नवी दिल्ली : 2021 मध्ये अनेक बीग बजेट चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी तयार आहेत, परंतु कोविड-19 ने त्यांच्या प्रदर्शनावर ग्रहण लावले आहे. कोरोना व्हायरसच्या प्रकरणात सातत्याने वाढ होत आहे. देशात नाईट कर्फ्यू आणि वीकेंड लॉकडाऊनची स्थिती आहे. मोठ्या बजेटचे हे चित्रपट वारंवार आपल्या प्रदर्शनाची तारीख बदलत आहेत. फिल्म इंडस्ट्रीचे सुमारे 1000 ते 1200 कोटी रुपये यामुळे अडकले आहेत.

बीग बजेट चित्रपटांविषयी बोलायचे तर यामध्ये सलमान खानचा चित्रपट ’राधे : यूआर मोस्ट वॉन्टेड भाई’, कंगना राणावतचा चित्रपट ’थलाइवी’, रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणचा चित्रपट ’83’, मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान आणि करीना कपूर खानचा चित्रपट ’लाल सिंह चड्ढा’, अक्षय कुमार स्टारिंग रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपट ’सूर्यवंशी’ आणि संजय दत्त-रणबीर कपूर चा चित्रपट ’शमशेरा’ यांचा समावेश आहे. या बीग बजेट चित्रपटांमध्ये प्रॉडक्शनचा मोठा पैसा लागला आहे, जर हे चित्रपट थिएटर्समध्ये रिलिज जरी झाले तरी कोरोना व्हायरसमुळे 30 टक्के ऑक्यूपन्सीमध्ये हे काही खास कमाई करू शकणार नाहीत. अशावेळी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज करण्याचा निर्णय मेकर्स घेतील का, हे आगामी काळच सांगू शकतो.

या चित्रपटांचे भविष्य अधांतरी

* सूर्यवंशी – या चित्रपटाला 200 ते 300 कोटींचा तोटा होऊ शकतो. चित्रपटाचे प्रॉडक्शन आणि प्रिंटचा खर्च सुमारे 100 कोटी झाला आहे. मार्च 2020 मध्ये रिलिज होणार होता.

* थलाइवी – हा चित्रपट 100 कोटी बजेटचा आहे. आता 23 एप्रिल तारीख दिली आहे. परंतु सद्यस्थिती पहाता रिलिज अशक्य आहे.

* 83 – हा चित्रपट 100 कोटी बजेटचा आहे. मागच्या वर्षी रिलिज होणार होता.

* भुज : द प्राईड इंडिया – अजय देवगणचा या चित्रपटात सुमारे 135 कोटी गुंतले आहेत.

* राधे : यूआर मोस्ट वॉन्टेड भाई – हा चित्रपट 13 मेरोजी रिलिज होणार आहे. चित्रपटात 150 कोटी अडकले आहेत.

* लाल सिंह चड्ढा – या चित्रपटाचा खर्च सुमारे 200-250 कोटी आहे. तो कधी रिलिज होणार अद्याप स्पष्ट नाही.

* शमशेरा – संजय दत्त आणि रणबीर कपूरच्या या चित्रपटात 140 कोटी अडकले आहेत.