‘हे’ ५ बीग बजेट सिनेमे बॉक्स ऑफीसवर सपशेल ‘फेल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आज संपूर्ण देश बजेट ची वाट पाहत आहे. फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्री मधील लोकांचीही बजेटकडून खूप आशा आहे. जर चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर मोठ्या बजेटचे चित्रपट हे हिट होतीलच असे नाही. तर पाहुयात असे ५ चित्रपट ज्यांचे बजेट जास्त असूनही ते प्रेक्षकांच्या मनात घर नाही करू शकले नाही.

thugs of hindostan

ठग्स ऑफ हिंदुस्तान –
अमिताभ बच्चन आणि आमिर खानचा ठग्स ऑफ हिंदुस्तान चित्रपट गेल्या वर्षीच्या फ्लॉप चित्रपटाच्या यादीतील एक चित्रपट आहे. या चित्रपटाचे बजेट २२० कोटी होते पण या चित्रपटाने नफा तर सोडा, जेवढा चित्रपट बनवण्यासाठी खर्च आला होता तेवढाही वसूल नाही केला. चित्रपट इतका फ्लॉप झाला की आमिर खानने क्षमा मागितली.

kalank

कलंक
कलंक चित्रपटाचे बजेट १५० कोटी होते. पण चित्रपट एक आठवडाही बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही. चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर सारखे मोठ मोठे कलाकार असूनही चिञपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही.

zero
जीरो
२०१८ मध्ये आलेला जीरो हा चित्रपट त्या वर्षांमधील फ्लॉप चित्रपटांपैकी एक चित्रपट होता. या चित्रपटात शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरीना कैफ हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या फ्लॉप नंतर शाहरुख ने आता पर्यंत एकही चित्रपट साइन केला नाही. जीरो चित्रपटाचे बजेट २०० कोटी होते.

drona
द्रोणा
२००८ मधील सगळ्यात फ्लॉप चित्रपटापैकी एक चित्रपट म्हणजे द्रोणा. या चित्रपटात अभिषेक बच्चन, प्रियंका चोपड़ा, जया बच्चन आणि केके मेनन प्रमुख भूमिकेत असतानाही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही. जवळपास ६० कोटी बजेट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर नाही करू शकला नाही.
bombay velvet
बॉम्बे वेलवेट
अनुराग कश्यप आणि करण जौहरने मिळून पहिल्यांदाच एक चित्रपट बनवला तो म्हणजे बॉम्बे वेलवेट. या चित्रपटात करण जौहर पहिल्यांदाच अॅक्टिंग करताना दिसून आला. रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माने यात प्रमुख भूमिका साकारली होती. २०१५ मध्ये आलेल्या या चित्रपटाचे बजेट १२० कोटी होते. तर या चित्रपटाने फक्त ४३ कोटी इतकी कमाई केली होती.

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय