कोर्टाचा निकाल येताच उभारली विजयाची पताका ; मराठा आरक्षणाच्या निर्णयावर भर पावसात फटाके वाजवून जल्लोष

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – प्रलंबित मराठा आरक्षणावर निर्णय आज मा. उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर या निर्णयाचे स्वागत शहरातील स्मायलिंंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्यावतीने भर पावसात करण्यात आले. छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकात सुरुवातीला आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहूमहाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत आरक्षण विजयाची भगवी पताका उभारली. फटाके व साखर वाटून कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला.

छत्रपती शाहू महाराजांच्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या राज्यात मराठा समाजालाही आरक्षण दिले होते. म्हणूनच शाहू महाराजांच्या या कार्याला मराठा समाज विसरू शकणार नाही, असे मत अॅड. निरंजन आढाव यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना अक्षय पवार यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या विकृत लोकांचा निषेध केला. ते म्हणाले की, मराठा समाज आर्थिक दृष्ट्या मागास असून विनाकारणच खोडसाळ पद्धतीने प्रसिद्धीस येण्यासाठी काही समाजकंटक विरोध करत आहेत.

स्मायलिंग अस्मिताचे कार्यवाह यशवंत तोडमल म्हणाले की, मागीलवर्षी अनेक मराठा विद्यार्थी प्रवेश शुल्क भरू शकत नसल्याने पदव्युत्तर शिक्षणापासून वंचित राहिले.परंतु मिळालेल्या या आरक्षणाने त्यांना निश्चित फायदा होईल. दरम्यान प्रवीण साबळे व धीरज कुमकर यांनी आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या सर्वांचे नामोल्लेख करत त्यांना विनम्र अभिवादन केले.

यावेळी उद्योजक ज्ञानेश्वर चव्हाण, इंजि. हेमंतराव मुळे, संभाजी कदम, सुहास घोरपडे, अजित भोर, शुभम कोल्हे यांच्यासह अनेक मराठा विद्यार्थी कार्यकर्ते भरपावसात छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त

गर्भधारने दरम्यान महिलांनी घ्या व्यायामाची अशी ” काळजी “

या कारणामुळे होतो ” ब्रेस्ट कॅन्सर “जाणून घ्या याची लक्षणे 

आजारापासून बचाव करण्यासाठी ‘मुळा’ गुणकारी, रहाल निरोगी 

एक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो 

सिनेजगत

Video : ‘बेबी डॉल’ सनी लिओनीवर झाडली ‘गोळी’, सनी कोसळली ; पुढे झाले ‘असे’ काही

‘कबीर सिंह’चं वादळ थांबता थांबेना ! आठवडयाभरात ‘या’ मोठया अभिनेत्यांच्या सिनेमांना टाकलं मागे

First Look : अभिनेता विक्‍की कौशल बनला फिल्ड मार्शल ‘सॅम मानेकशॉ’ !

 

You might also like