शरद पवारांना मोठा धक्‍का ; नीरा डाव्या कालव्याच्या पाण्याबाबत जलसंपदा विभागाचा मोठा निर्णय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – नीरा डाव्या कालव्याच्या पाण्यावरून गेल्या काही दिवसांपासुन मोठे वादंग निर्माण झाले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माढयाला हक्‍काचे पाणी देणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. माढयाला हक्‍काचे पाणी मिळावे म्हणून नवनियुक्‍त खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पाठपुरावा करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आता बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी हे माढयाला देण्याचा आदेशच जलसंपदा विभागाने काढला आहे.

नीरा देवधर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश देणार असल्याचे यापुर्वीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले होते. त्याबाबतचा शासकीय आदेश आज काढण्यात आला आहे. ३ एप्रिल २०१७ पर्यंतचा करार संपल्यानंतर देखील नियमबाह्य पाणी बारामती तालुक्याला देण्यात येत होते. दिले जाणारे पाणी पुन्हा फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला मिळावे अशी मागणी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी खासदार माहिते पाटील यांनी केली होती. शासनाने आज आदेश काढल्याने बारामतीचे पाणी आता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्‍का बसला आहे.

आरोग्यविषयक वृत्त
अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात