Lockdown : ‘कोरोना’च्या संकटावर इंडियन ऑईलचा मोठा निर्णय, आता ‘एवढया’ दिवसानंतर बुक करू शकता गॅस सिलेंडर (व्हिडीओ)

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाव्हायरसमुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे लोक पॅनिक बुकिंग करत आहेत, जे थांबविण्यासाठी सतत आवाहन केले जात आहे. आता सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) देखील कोरोना विषाणूचा विचार करता लोकांना ‘पॅनिक बुकिंग’ न करण्याचे आवाहन केले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की आता एलपीजी केवळ 15 दिवसांच्या फरकाने बुक केले जाऊ शकते. तेल कंपनीचे अध्यक्ष संजीव सिंह यांनी व्हिडिओ संदेशात असे आश्वासन दिले की, देशात एलपीजीची कमतरता नाही.

संजीव सिंह यांनी म्हटले की, देशभरात पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा सुरळीत आहे. पेट्रोल, डिझेल किंवा स्वयंपाकाच्या गॅसमध्ये कोणतीही कमतरता किंवा समस्या नाही. विशेषत: एलपीजीबाबत तुम्ही लोक निश्चिंत रहा. एलपीजीचा पुरवठा सुरळीत सुरू आहे आणि सुरू राहील. पॅनिक बुकिंग करू नये अशी ग्राहकांना विनंती आहे. यामुळे प्रणालीवर अनावश्यक दबाव पडत आहे. आम्ही आता सिस्टीम सुरू केली आहे की, ग्राहक कमीतकमी 15 दिवसांच्या आधी रिफिल बुकिंग करू शकणार नाहीत.

एलपीजीची वाढती मागणी : लॉकडाऊननंतर देशात पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी झाला आहे, परंतु एलपीजीची मागणी वाढली आहे. आतापर्यंत ग्राहकांच्या बुकिंगसाठी कोणतीही मर्यादा नव्हती. सामान्य ग्राहकांना वर्षामध्ये पहिल्या 12 घरगुती एलपीजी सिलिंडरवर अनुदान मिळते, तर त्यानंतर अनुदान मिळत नाही.