सर्वोच्च न्यायालयात मोठा निर्णय ! पार्किंगमधून वाहन चोरीला गेल्यास ‘हॉटेल’ जबाबदार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण हॉटेलमध्ये गेल्यावर तेथे पार्किंगसाठी जागा असते. पण, त्यठिकाणी लिहिलेले असते की, मालकाने आपल्या सुरक्षेवर गाडी पार्क करावी. त्याची जबाबदारी हॉटेलवर नाही. पण, आता हॉटेलला तसे करता येणार नाही. कारण, एका खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने हॉटेल पार्किंगबाबत काही गाईडलाईनच दिल्या आहेत. हॉटेलच्या पार्किंगमधून गाडी चोरीला गेली तर त्याची जबाबदारी हॉटेलला टाळता येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.

दिल्लीतील ताजमहाल हॉटेलच्या पार्किंगमधुन १९९८ मध्ये एक जणाची मारुती जेन कार चोरीला गेली होती. याबाबत त्याने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागितली होती. हॉटेलमध्ये ज्या स्थितीत कार पार्क केली होती. त्या स्थितीत ग्राहकाला परत मिळाली पाहिजे, असे सांगून दिल्लीच्या ताज महाल हॉटेलला आयोगाने २ लाख ८० हजार रुपयांचा दंड केला होता.

त्याविरोधात गेली अनेक वर्षे खटला चालला होता. सर्वोच्च न्यायालयाने आता याबाबत निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, पार्किंग सर्व्हिस फ्री असल्याचे सांगून हॉटेलला अशा गोष्टीपासून पळ काढता येणार नाही. हॉटेल अगोदरच रुम, फुड, एंट्री फीच्या नावाखाली सर्व्हिस चार्ज घेत असतात. पार्किंगमधून वाहनाची चोरी झाली तर त्याची जबाबदारी हॉटेलची राहिल. जर मालकाने गाडीची चावी पार्किंग केल्यावर अथवा पार्किंगसाठी हॉटेलच्या कर्मचाऱ्याकडे दिली असेल. आणि गाडी चोरीला गेली अथवा तिचे काही नुकसान झाले तर त्याची नुकसान भरपाई हॉटेलला द्यावी लागेल. मात्र, अशी नुकसान भरपाई देताना त्यासाठी ठोस पुरावा असला पाहिजे, असे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे आता हॉटेल ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे.
Visit : Policenama.com