मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या सेवेवरही सैनिकांना ‘दिव्यांग’ पेंशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संरक्षण मंत्रालयाने बुधवारी १० वर्षांपेक्षा कमी कालावधीत सेवा देणाऱ्या सैनिकांना दिव्यांग पेन्शन मंजूर केले आहे. आतापर्यंत ही पेन्शन फक्त त्या सैन्य दलाच्या जवानांना दिली जात होती, ज्यांनी १० वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा केली आहे आणि लष्करी सेवेशी संबंधित नसलेल्या कारणांमुळे दिव्यांग झाले आहेत.

खरं तर, आत्तापर्यंत एखादा सैनिक अपंगत्वाच्या वेळी जर त्याने १० वर्षांपेक्षा कमी कालावधीची सेवा दिली, तर त्याला फक्त अपंगत्व ग्रॅच्युइटी दिली जात होती. मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, १० वर्षांपेक्षा कमी कालावधीत सेवा देणाऱ्या आणि नोकरी करण्यास असमर्थ राहिल्यामुळे कायमस्वरूपी काढून टाकण्यात आलेल्या कोणत्याही सैन्यदलाच्या जवानांनाही या निर्णयाचा फायदा होईल. यासंदर्भातील प्रस्तावाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे. नवीन नियम ४ जानेवारी २०१९ पासून लागू होईल.

मोदी सरकार सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी अनेक पावले उचलत आहे. नुकतीच संरक्षण मंत्रालयाने माजी सैनिक आणि त्यांच्या कुटूंबांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी तयार केलेली योजना एक्स सर्व्हिसमॅन काँट्रीब्युटरी हेल्थ स्कीम (ईसीएचएस) अंतर्गत माजी सैनिकांना २५ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त अविवाहित आणि अपंग मुलांना लाभार्थी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत कुटुंबातील एका कोरोना पीडित रुग्णाला ऑक्सिजन देण्याचा खर्चही उचलण्याची घोषणा करण्यात आली आहे.