मुकेश अंबानींचा मोठा निर्णय ! कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला 5 वर्ष सॅलरी अन् मुलांना शिक्षण देणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमणाचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यामुळे अनेकांना कुटुंबातील कर्त्या माणसालाही गमवावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता उद्योगपती मुकेश अंबानी यांनीही रिलायन्समध्ये Reliance काम करणाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

पतांजलिच्या ‘कोरोनिल’वरुन न्यायालयाने बजावले समन्स; बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ

ज्या कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला असेल त्याच्या कुटुंबाला पाच वर्ष पूर्ण वेतन देण्याचा निर्णय रिलायन्स Reliance इंडियानं घेतला आहे. त्याचबरोबर १० लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्यही करण्यात येणार आहे. याशिवाय अशा कर्मचाऱ्यांच्या मुलांचा पदवीपर्यंत शिक्षणाचा आणि कुटुंबाचा खर्चही रिलायन्स उचलणार आहे.

काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना त्या कर्मचाऱ्याच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत (म्हणजे निवृत्ती वयापर्यंत ) संपूर्ण वेतन देण्यात येईल. तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण व्यवस्थादेखील कंपनीच करेल आणि अशा कुटुंबांना वैद्यकीय तसेच निवासाची सुविधाही मिळत राहील, अशी घोषणा केली होती. कर्मचाऱ्यांच्या आणि भागधारकांच्या हितासाठी कंपनी व्यवस्थापन नेहमीच कार्यरत आहे. कोरोना सारख्या संकटातही टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचार्‍यांच्या आणि समाजाच्या सामाजिक कल्याणासाठी प्रयत्न करत आहे. असेही कंपनीने म्हंटले होते.

त्यानंतर आता रिलायन्स उद्योग समूहाने कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कंपनी ५ वर्षापर्यंत पगार आणि मुलांच्या शिक्षणासाठी ट्यूशन फी, हॉस्टेलचा खर्च आणि पुस्तकांचा खर्च उचलणार आहे.
त्याशिवाय पदवीपर्यंत शिक्षण होईपर्यंत पती किंवा पत्नी, आईवडील आणि मुलांच्या हॉस्पिटालायजेशन कवरेज १०० टक्के प्रिमियम कंपनीकडून भरला जाईल.
कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला एकरकमी १० लाख रुपये दिले जातील.
दम्यान, ज्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली असेल तर अशांना कोरोना सुटीचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कारण काही वेळा कुटुंबातील सदस्यांना जर कोरोना झाला असेल तर त्यांना या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी अथवा देखरेखीसाठी वेळ मिळत नव्हता.
पण अवधी वाढवल्याने कर्मचाऱ्यांना त्यावर लक्ष केंद्रीत करता येणार आहे.

 

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले