ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर निश्चित, रुग्णांची लूट थांबणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनानंतर आता राज्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण (mucormycosis patient) मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. राज्यात म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी काही रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिल आकारत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या प्रकराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यभरात म्युकरमायकोसिसवर उपचार देणाऱ्या रुग्णालयांना या आजाराच्या उपचारांसाठीचे दर निश्चित करून दिले आहेत. निश्चित दरांपेक्षा जास्त दर कोणत्याही रुग्णालयाला आता आकारता येणार नाही. राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर (mucormycosis patient) मोफत उपचार करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता.
त्यानुसार महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयातून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर ((mucormycosis patient)) मोफत उपचार केले जात आहेत.
मात्र खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उपचाराबाबात खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता.
त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूरी दिली असून ही अधिसूचना आजपासून 31 जुलै 2021 पर्यंत राज्यभर लागू राहणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

म्युकरमायकोसिसचा उपचार करणारे रुग्णालय कोणत्या विभागात आहे.
त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांची, शहरांची आणि भागांची विभागणी केली आहे.
त्यानुसार हे दर आकारले जातील.
तसेच, कोणत्या सुविधा दिल्या जात आहेत,
त्यानुसार प्रतिदिन कमाल किती दर आकारता येतील, हे सरकारने काढलेल्या आदेशांमध्ये स्पष्ट केले आहे.

 

सुविधा अन् प्रतिदिन आकारले जाणार दर पुढीलप्रमाणे
1) वॉर्ड आणि आयसोलेशनची सुविधा – अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी 4 हजार रुपये प्रतिदिन, ब श्रेणीसाठी 3 हजार रुपये प्रतिदिन तर क श्रेणीसाठी 2 हजार 400 रुपये प्रतिदिन आकारता येतील.
2) आयसीयूशिवाय फक्त व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन – अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी 7 हजार 500 रुपये प्रतिदिन, ब श्रेणीसाठी 5 हजार 500 रुपये प्रतिदिन तर क श्रेणीसाठी 4 हजार 500 रुपये प्रतिदिन आकारता येतील.
3) आयसीयू, व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन – अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी 9 हजार रुपये प्रतिदिन, ब श्रेणीसाठी 6 हजार 700 रुपये प्रतिदिन तर क श्रेणीसाठी 5 हजार 400 रुपये प्रतिदिन आकारता येतील.

4) विशेष म्हणजे म्युकरमायकोसिस आजारात शस्त्रक्रिया हा उपचारातील महत्वाचा घटक लक्षात घेऊन राज्य शासनाने 28 प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठीचा खर्च निश्चित केला असून अ वर्ग शहरांमध्ये त्यासाठी 1 लाख रुपयांपासून ते 10 हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी 75 हजार रुपयांपासून ते 7500 रुपयांपर्यंत आणि क वर्गातील शहरांसाठी 60 हजार रुपयांपासून ते 6000 रुपयांपर्यंत दर ठरवून दिले आहेत.

 

कोणत्या श्रेणीमध्ये कोणती शहरे जाणून घ्या
1) अ श्रेणी- मुंबई विभाग (मुंबई महानगर पालिका, मीरा भाईंदर महानगर पालिका, ठाणे महानगर पालिका, नवी मुंबई महानगर पालिका, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, उल्हासनगर महानगर पालिका, अंबरनाथ महानगर पालिका, कुळगाव बदलापूर महानगर पालिका, पनवेल महानगर पालिका).
पुणे विभाग (पुणे महानगर पालिका, पुणे कँटोनमेंट, खडकी कँटोनमेंट, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, देहूरोड कँटोनमेंट, देहू सीटी).
नागपूर विभाग (नागपूर महानगर पालिका, दिगडोह सीटी, वाडी सीटी)

2) ब श्रेणी- नाशिक (नाशिक महापालिका, एकलहरे, देवळाली कँटोनमेंट, भगूर नगरपरिषद), अमरावती महापालिका,
औरंगाबाद (महापालिका आणि कँटोनमेंट),
भिवंडी (महापालिका आणि खोनी),
सोलापूर महापालिका,
कोल्हापूर (महापालिका आणि गांधीनगर),
वसई-विरार महापालिका,
मालेगाव (महापालिका, धायगाव, दरेगाव, सोयगाव, द्याने, मालदा),
नांदेड महापालिका, सांगली (सांगली-मिरज कुपवाड महापालिका, माधवनगर)

3) क श्रेणी -अ आणि ब गट वगळता सर्व भाग

READ ALSO THIS :

LIC कन्यादान पॉलिसी : जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?

दुसर्‍या खुनातून पहिल्या खुनाचा झाला ‘उलघडा’ ! 2 खुन, एक मृत्यु आणि एका आत्महत्येला ठरला ‘तो’ कारणीभूत

भाडेकरूंसाठी खुशखबर ! 2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये घरमालक

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलने मोडले सर्व विक्रम, सतत होतेय महाग, जाणून घ्या आजचे दर

मोफत रेशन घेण्यासाठी घरबसल्या बनवा Ration Card; जाणून घ्या ऑनलाइन अप्लाय करण्याची संपूर्ण प्रोसेस