पुण्यातील Lockdown बाबत मोठा निर्णय ! आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून घोषणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. दरम्यान, राज्यात सर्वत्र कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पुण्यात तर शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन सुरू आहे. आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. पुण्यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.

सध्या पुण्यातील कोरोना पॉझिटिव्हीटीचे प्रमाण कमी होत आहे. राज्यात केवळ आणि केवळ पुण्यामध्येच दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येत होत्या. कोरोना रूग्णांची संख्या घटल्याने लोकप्रतिनिधींकडून शनिवार आणि रविवारी पुण्यात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याबाबतची मागणी होत होती. त्यानुसार आता पुण्यात सकाळी 7 ते 11 या दरम्यान अत्यावश्यक सेवा शनिवारी आणि रविवारी देखील सुरू राहणार आहेत असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या पुण्यात कोरोना पॉझिटिव्हीटेचे प्रमाण हे 11.9 टक्के आहे. पुण्यातील सर्वच सरकारी यंत्रणांनी चांगली कामगिरी केली आहे. आगामी काळात हे प्रमाण आणखी खाली येण्याचा अंदाज असल्याचं देखील टोपे यांनी यावेळी सांगितलं आहे.

खुशखबर ! शेतकर्‍यांना मिळणार 4000 रुपये; 30 जूनच्या पूर्वी येथे करावा लागेल अर्ज, जाणून घ्या पूर्ण डिटेल

राज्यातील ज्या जिल्हयांमध्ये कोरोनाच्या पॉझिटिव्हीटीचं प्रमाण जास्त आहे तिथं मात्र 15 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हयातील कोरोनाची स्थिती पाहूनच तेथे शिथीलता देण्यात येणार आहे. त्याबाबचे सर्व आदेश 1 जून रोजी किंवा त्यापुर्वी काढले जातील असे देखील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. दरम्यान, पुण्यात शनिवारी आणि रविवारी सकाळी 7 ते 11 दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्यानं पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

BMC Election 2021 : निवडणूक पुढे ढकलली जाणार ? केंद्रीय निवडणूक आयोगाची अधिकाऱ्यांसोबत बैठक, लवकरच होणार निर्णय

सायलेंट किलर म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘या’ मोठ्या आजाराला बळी पडतात ‘या’ ब्लड ग्रुपचे लोक, रहा सांभाळून

‘शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा काय केलं ?’, पवार-संभजीराजेंच्या भेटीवरुन खा. नारायण राणेंचा सवाल 

अ‍ॅलर्जीपासून सांधेदुखीपर्यंत, जास्त टोमॅटो खाल्ल्याने होतात ‘या’ 8 प्रकारचे नुकसान

कशामुळं घशा त काहीतरी अडकल्यासारखं वाटतं? जाणून घ्या त्याची कारणे अन् उपाय