Pune : पुण्यात शनिवार अन् रविवारच्या कडक निर्बंधामध्ये शिथीलता, सकाळी 7 ते 11 च्या दरम्यान उघडी राहणार ‘ही’ दुकाने

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. राज्यात लॉकडाऊन सुरु असून शनिवार आणि रविवार या दिवशी अत्यावश्यक सेवा(essential services) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पुणे शहरातील रुग्णांची संख्या कमी झाल्याने आणि पॉझिटिव्हीटीचे प्रमाण कमी झाल्याने शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा(essential services) बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार होणार ? RBI ची मोठी घोषणा

पुण्यात पॉझिटिव्हीटीचे प्रमाण 11.9 टक्के आहे. पुण्यात प्रशासनाकडून चांगले काम केले जात असल्याने आगामी काळात हे प्रमाण 9 टक्क्यांपर्यंत येईल, असा अंदाज राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. तसेच शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा सुरु करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. त्यानुसार आता पुण्यातील अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 या कालावधीत शनिवारी आणि रविवार सुरु राहणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले…

पुणे मनपा हद्दीत शनिवार आणि रविवारी देखील अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु राहणार आहेत. या संदर्भातील मागणी आपण आढावा बैठकीत केली. त्यानुसार निर्णय घेतला आहे. किराणा, भाजी, दूध, बेकरी अशा अस्थापनांचा यात समावेश असेल, अशी प्रतिक्रिया पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

 

Blood Clot : हात-पायात वेदनांसह ‘या’ 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, ब्लड क्लॉटचे आहेत संकेत

अजितदादांच्या गैरहजरीवरून बैठकीत रंगल्या चर्चा; पण…

कमजोर इम्यूनिटी असणार्‍यांना होऊ शकतो TB चा आजार, पीडित व्यक्तींनी घ्यावी ‘ही’ काळजी

कोरोना रूग्णांमध्ये समोर आले एक नवीन फंगल इन्फेक्शन, लपून करत होता हल्ला; जाणून घ्या