Lockdown 4.0 : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नागपूर : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोना संसर्गित रुग्णांनी नुकताच ४० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच मुंबई, पुणे औरंगाबाद, सोलापूर नंतर नागपुरमध्ये संसर्गित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, २५ मे रोजी रमजान ईद आहे. ईदमुळे राज्यातील कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची भीती वर्तवण्यात येत असून, खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लॉकडाऊनची अंमलबाजवणी आणखी कठोर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

उपराजधानी असलेल्या नागपुरात आजपासून केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या
(CRPF) तैनात करण्यात आल्या आहे. सध्या शहरात एकूण ८० जवानांची तुकडी दाखल झाली आहे. त्या CRPF च्या जवानांना रेड झोनमध्ये तैनात करण्यात आलं आहे. तर नागपुरात कोरोना संसर्गित रुग्णाची संख्या ४०९ झाली असून. संसर्गावरती मात करणाऱ्यांची संख्या २९८ झाली आहे.

पोलिसांनीच पोलिसांसाठी सुरु केलं ‘फीवर क्लिनिक’

कोरोना संसर्गाशी दिवसाचा रात्र करून लढणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि मेडिकल स्टाफ सोबत रस्त्यावरती तैनात असणाऱ्या पोलिसांचं योगदान देखील अत्यंत महत्वाचं आहे. ड्युटीवर असणारे पोलिस कर्मचारी कोरोना संसर्गाच्या विळख्यात येत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनीच पोलिसांसाठी फिवर क्लिनिक सुरु केलं आहे.

नागपुरात तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची लागण झाल्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर पोलिस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळं पोलिस विभागाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रशासकीय यंत्रणेवर कामाचा अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी नागपूर पोलिसांनीच पोलिसांच्या आरोग्यासाठी चालत फिरत ‘फिवर क्लिनिक’ हा उपक्रम सुरु केला आहे.

या फिवर क्लिनिक द्वारे शहरातील सर्व आठ हजार पोलिसांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. शहरातील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना कोरोना संसर्गाची लक्षणे आहेत का? हे तपासलं जात आहे. लक्षणं आढळल्यास त्यांची कोरोना संसर्ग चाचणी करून त्यांना पोलिस विभागाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलं जातं. तसेच चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर पोलिस विभागानं सुरु केलेल्या कोविड सेंटरमध्ये त्यांच्यावरती उपचार केले जातात, अशी माहिती पोलिस रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप शिंदे यांनी दिली.