कुमारस्वामी ‘विश्वासदर्शक’ ठरावाला अनुपस्थित राहणार्‍या बसपा आमदाराचा ‘मोठा’ खुलासा

बंगलुरु : वृत्तसंस्था – कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारवरील विश्वास दर्शक ठरावाला बसपाचे समर्थन असतानाही पक्षाचे आमदार एन. महेश हे अनुपस्थित राहिले. त्यानंतर मायावती यांनी त्यांची गंभीर दखल घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर त्यांनी एक मोठा खुलासा केला असून त्यात त्यांनी आपल्याला ट्विटरबाबत काहीच माहिती नसल्याने कम्युनिकेशन गॅप राहिले. त्यामुळे आपण अनुपस्थित राहिलो असे सांगितले आहे.

बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने सत्ता आणि पैशाचा गैरवापर करुन विरोधकांचे सरकार पाडण्याचे काम केले गेले. हे एक लोकशाहीच्या इतिहासात काळा अध्याय म्हणून ओळखले जाईल. त्याअगोदर त्यांनी कर्नाटकमध्ये कुमारस्वामी सरकारच्या समर्थनाच्या बाजूने पक्ष मतदान करेल असे ट्विट केले होते. मात्र, एन महेश हे मतदानाला अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांना पक्षाने काढून टाकले आहे.

याबाबत महेश यांनी आपल्याला ट्विटरबाबत काहीच माहिती नसल्याचा खुलासा केला. आमच्या पक्षाचे कर्नाटक प्रभारी आणि राज्यसभा खासदार अशोख सिद्धार्थ यांनी मायावती यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर मला तटस्थ राहण्यासाठी सांगितले होते. त्याप्रमाणे आपण तटस्थ राहिलो. ट्विटरविषयी आपल्याला काहीही माहिती नसल्याने मायावती यांनी काय ट्विट केले याची आपल्याला माहिती नसल्याचा खुलासा केला आहे.