Post_Banner_Top

कास्टींग काऊचबद्दल ‘त्या’ अभिनेत्रीचा मोठा खुलासा ; म्हणाली, “मी कपडे उतरवले कारण…”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कास्टींग काऊच बद्दल अनेकांनी खुलासा केला आहे. मागील काहि दिवसांमध्ये मीटू या अभिनयानाने जोर धरला होता. या दरम्यान अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावरील झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल वाच्यता केली होती. अशातच तेलुगु सिनेमा अभिनेत्री श्री रेड्डी सध्या चर्चेत आहे. गेल्या वर्षी तिने टॉलिवूडमधील अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांवर कास्टींग काऊच सारखे गंभीर आरोप करत तेलुगु फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स समोर टॉपलेस होत प्रदर्शन केलं होतं. आता श्रीने तिच्या वाईट काळातील तिचे दु:ख शेअर केले आहे. तिने मोठे वक्तव्य केले आहे.

श्री रेड्डी म्हणाली की, “मी कपडे उतरवल्यानंतर जबरदस्त प्रतिक्रिया मिळाली. कास्टींग काऊचच्या प्रकरणांना गंभीरतेने घेतले गेले आणि याची चौकशी सुरु करण्यात आली. टॉपलेस होऊन प्रदर्शन केल्यामुळेच टॉलिवूड इंडस्ट्री आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर रावने माझे दु:ख समजले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नकुतीच 25 सदस्यांची कमिटी तयार केली आहे. ही कमिटी टॉलिवूडमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करत आहे. या निर्णयावर श्रीने प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या फेसबुक पेजवर त्यांचे कौतुक केले आहे.

यानंतर आता श्री रेड्डीने जन सेना पार्टीचे प्रमुख आणि अभिनेता पवन कल्याण याच्या हल्ला चढवला आहे. ती म्हणाली आहे की, “काही दिवसांपूर्वी पवन कल्याण ने, प्रसिद्ध कॉमेडियन अली यांनी वायएसआर काँग्रेस पार्टीत प्रवेश करण्यामुळे म्हटले होते की, त्यांच्या प्रवेशामुळे मी नाराज आहे” असे रेड्डीने म्हटले आहे.

श्री रेड्डीची एक पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. यात तिने पुन्हा एकदा पवन कल्याणवर हल्ला चढवला आहे. आपल्या पोस्टमध्ये रेड्डी म्हणते की, “पवन कल्याणला अली सारख्या महान माणसाचा अपमान करण्याचा काही एक अधिकार नाही” असे श्री रेड्डीने म्हटले आहे.

Loading...
You might also like