धक्कादायक ! अभिनंदन वर्धमान यांना मारण्यासाठी पाकिस्तानने रचलं होतं ‘हे’ षडयंत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसून हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानचं एफ १६ हे विमान पाडलं होतं. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारतीय लष्कराचे ४० जवान शाहिद झाले होते. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले होते.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या विमानांनी भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारताच्या अभिनंदन वर्धमान याने त्या विमानांना पिटाळून लावले होते. मात्र यामध्ये त्यांच्या विमानाला अपघात होऊन ते पाकिस्तानमध्ये कोसळले. मात्र या सगळ्यात ते पाकिस्तानी लष्करच्या तावडीत सापडल्याने त्यांना बंदी बनविण्यात आले. त्यानंतर भारताच्या दबावापुढे झुकत त्यांनी अभिनंदन यांची सुटका देखील केली. मात्र आता त्यांच्याविषयी धक्कादायक माहिती समोर येत असून पाकिस्तानने त्यांना मारण्याचा कट रचला होता, अशी माहिती समोर येत आहे.

ज्यावेळी अभिनंदन पाकिस्तानच्या हवाई हद्दीत गेले त्यावेळी त्यांना भारतीय कंट्रोल रूममधून परत येण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र पाकिस्तानने त्यांची कम्युनिकेशन सिस्टम जॅम केल्याने त्यांना हा संदेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांना पाकिस्तानमधील काश्मीर प्रांतात उतरावे लागले. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अभिनंदन यांच्या मिग-२१ या विमानात जर अँटी जॅमिंग तंत्रज्ञान असते तर भारतात पुन्हा परतू शकले असते.मात्र पाकिस्तानने त्यांची हि सिस्टीम हॅक करून त्यांच्या परतीचे मार्ग बंद केले.

दरम्यान, त्यांच्या या गौरवास्पद कार्याचा उद्या भारत सरकारकडून गौरव करण्यात येणार असून वीरचक्र पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्याबरोबर लष्करातील अनेक अधिकाऱ्यांना विविध प्रकारचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like