टेक्नोलाॅजीनवीदिल्ली

Flipstart Days Sale : Apple ‘वॉच’वर भरघोस सूट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टने ‘Flipstart Days Sale’ ची घोषणा केली आहे आणि या विक्रीमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रॉडक्ट्स वर भारी सवलतीसह आकर्षक ऑफर्सदेखील मिळणार आहेत. 1 मार्चपासून सुरू झालेला हा सेल 3 मार्चपर्यंत चालणार आहे. आज सेलचा दुसरा दिवस असून आज आपल्याला कमी किंमतीत अनेक डिव्हाइस खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. Flipstart Days Sale मध्ये आपण स्मार्टवॉच ला उत्कृष्ट डिस्काउंट ऑफरसह खरेदी करू शकणार आहात. आज सेलमध्ये स्मार्टवॉचवर असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.

Flipstart Days Sale वर अ‍ॅक्सेसरीज आणि वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांना एचएसबीसी (HSBC) क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्क्यांची त्वरित सूट मिळू शकते. याशिवाय फेडरल बँक (Federal Bank) क्रेडिट कार्डवर देखील 10 टक्क्यांची त्वरित सूट दिली जात आहे. दुसरीकडे, आपण फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरुन 5 टक्क्यांपर्यंत अमर्यादित कॅशबॅक चा फायदा देखील मिळवू शकता.

Huami Amazfit Bip स्मार्टवॉच
या स्मार्टवॉच ला Flipstart Days Sale मध्ये 4,980 रुपयांत खरेदी करता येऊ शकते. ही स्मार्टवॉच एकदा चार्ज केल्याने 45 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप देण्यास सक्षम असते. यात ऑल्वेज ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय आपण यावरून कॉल, मेसेजेस, ई-मेल, फेसबुक आणि अन्य अ‍ॅप्सच्या नोटिफिकेशन्स देखील पाहू शकणार आहात. विशेष म्हणजे ही स्मार्टवॉच Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मना सपोर्ट करते.

Gionee Smart Life स्मार्टवॉच
ही स्मार्टवॉच Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर सहज कनेक्ट होते आणि यात हार्ट रेट मॉनिटर आणि कॅलरी मीटर सारखी वैशिष्ट्ये आहेत. या व्यतिरिक्त आपण यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, मेल आणि कॉल इत्यादीच्या नोटिफिकेशन देखील पाहू शकता. हे डिव्हाइस 5 एटीएम वॉटरप्रूफ आहे म्हणजेच आपण हे पाण्यात देखील वापरू शकता. या स्मार्टवॉचची बॅटरी एकदा चार्ज केल्यास 15 दिवस बॅकअप देण्यास सक्षम आहे. Flipstart Days Sale मध्ये ही स्मार्टवॉच 3,499 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

Apple Watch Series 3 GPS स्मार्टवॉच
जर तुम्हाला Apple चे स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. Flipstart Days Sale मध्ये Apple Watch Series 3 GPS चे 38mm व्हेरिएंट 20,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आपण ते कोस्ट ईएमआय पर्यायात देखील खरेदी करू शकता. एचडीएफसी बँक (HDFC Bank) क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्याने 1,000 रुपयांची त्वरित सूटही दिली जात आहे. परंतु ही Apple Watch केवळ आयओएस (iOS) प्लॅटफॉर्मवरच काम करते.

Back to top button