मोठी स्वप्न साकार करणार, आम्हाला वस्तुस्थितीचे भान : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभेनंतर मागील १००-१२५ दिवसांत झालेले बदल तुम्ही पाहात आहात. कलम ३७० रद्द केल्याने भारत देश आता कोणाला घाबरणारा देश नाही, हा संदेश संपुर्ण जगामध्ये गेला आहे. संपुर्ण जगामध्ये देशाचा दबदबा निर्माण झाला असून औद्योगीक आणि आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून जग भारताकडे पाहू लागले आहे. ज्यांनी ज्यांनी देशाला लुटले अशां दिल्ली ते मुंबईपर्यंतच्या लोकांची अवस्था सध्या तुम्ही पाहात आहात. जोपर्यंत त्यांनी लुटलेला एक एक पैसा वसुल होत नाही, तोपर्यंत हे अभियान सुरूच राहाणार असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे जाहीर सभेमध्ये दिला.

LIVE | पुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी

Geplaatst door Policenama op Donderdag 17 oktober 2019


विधानसभा निवडणुकीतील भाजप – शिवसेना – रिपाइं महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ स. प. महाविद्यालय मैदानावर आयोजित सभेत मोदी बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपचे प्रदेश अध्यक्ष व कोथरूड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील, शिवसेना नेत्या डॉ. निलम गोर्‍हे, खासदार गिरीश बापट, संजय काकडे, अमर साबळे, माजी खासदार अनिल शिरोळे, भाजपच्या शहर अध्यक्ष व पर्वती मतदारसंघाच्या उमेदवार माधुरी मिसाळ, माजी मंत्री दिलीप कांबळे, उमेदवार भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप, सुनील कांबळे, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, सिद्धार्थ शिरोळे हे याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

नरेंद्र मोदी म्हणाले, की मी जव्हा जेव्हा आलो त्यावेळी पुणेकारांनी मला भरभरून दिले आहे. २०१४, २०१९ ला महायुतीला भरभरून यश दिले, मी पुणेकरांना नमन करतो. लोकशाहीत जनांदेश मोठा असतो. पुणे ते सेंटर आहे, येथील लोकांना संस्कारांची आणि महापुरूषांची पार्श्वभूमी आहे. देशाला दिशा देण्यासाठीची नीती असो अथवा अर्थ व्यवस्था सुधारण्यासाठीी सशक्त सरकारची गरज होती. आपण ते दिले. तुम्ही पाच वर्षांसाठी सरकार निवडले आहे, अजून पाच महिनेही झालेले नाहीत. एवढया कमी काळात पाच वर्षांचे खाते पूर्ण केले आहे. मागील १०० दिवसात आपल्याला नवीन भारताचा अनुभव दिसतो? दमखम दिसतो? विदेश नितींमध्ये नवीन धार दिसतेय न? असे नेहमीच्या स्टाईलने प्रश्‍न उपस्थित करत समोरील जनसमुदायाकडून उत्तरे मागितली. संपूर्ण जगाला ती दिसू लागली आहे. हे का होतेय म मोदी, मोदी, मोदी…आपण चुकीचे आहे. हे मोदींमुळे नाही तर १३० कोटी भरतीयांमुळे होत आहे. जगातील दिगग्ज नेता मोदी च्या सोबत हात मिळवतो त्याला १३० करोड भारतीय दिसतात.

गणेश उत्सत्वाच्या माध्यमातून टिळकांनी स्वराज्याची भावना जागवली होती. त्याच भावनेने सगळे एकत्र येऊन सुराज्यासाठी करत आहेात. विकासात प्रत्येक भारतीयांचे योगदान दिसले पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. ३७० चा निर्णय जम्मू काश्मीर चा प्रश्न ७० वर्षापासून वाट पाहात होतो. अनेक अडथळे होते, कोणी हिम्मत करत नव्हते. पूर्वीही पूर्ण बहुमताचे सरकार होते. पण काय झाले नाही. परंतु हा बदलेला भारत आहे, कोणी डोळे वर केले तर हा घाबरणारा देश नाही. हा केवळ ३७० चा प्रश्न नाही. परंतु आपण एकत्रीकरण केल्याने जम्मू कश्मिर, लडाखमधील फुटीरतावाद कमी होईल. याचा फायदा संपूर्ण देशाला होणार आहे. औद्योगिकरण, गुंतवणुकीला चालना मिळणार आहे.

नवीन तंत्रज्ञान येत असताना त्यामुळे होणारे बदल आम्हाला स्वीकारावे लागेल. यासाठी स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करत आहोत. अनेक देश आपल्या भारतात गुंतवणुकीस तयार आहेत. आपण आर्थिक पातळीवर अनेक निर्णय घेतले आहेत. गुंतवणुकीसाठी जे निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी आम्ही तयार आहोत. इन्फ्रास्ट्रकचरवर १२५ लाख कोटी गुंतवणूक करणार आहोत. याचा लाभ पुण्यासारख्या शहराला होणार आहे. मागील पाच वर्षात पुण्याशी कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मेट्रो मुळे पुण्याची वाहतूक सुधारणार आहे. तेजस सारखी रेल्वेसेवा पुण्याला मिळणार आहे. विमान वाहतूक वाढली आहे. डिजिटल क्रांती ही भारताची ताकत असून आम्ही त्यात काम करत आहोत. डिजिटल करन्सी चा वापर वाढत आहे. भीम अँप, रूपे कार्ड चा वापर २९ कोटींवर गेला आहे. या गतीमुळेच आम्ही पाच ट्रीलियन अर्थव्यस्थेकडे पोहोचू. काहींना शंका येते परंतु आमचे ट्रॅक रेकॉर्ड आणि युवा शक्तीवर आमचा विश्वास आहे. जेवढी मोठी अर्थव्यवस्था असेल तेवढी गरिबी कमी होईल. युवकांच्या आशा पूर्ण होतील.
आम्ही देशाच्या विकासासाठी काही करू शकतो. यासाठी इमानदार मध्यमवर्गीय लोकांसोबत आम्ही उभे आहोत. प्रत्येकाची आकाउंटबिलिटी आहे. ज्यांना कधी कोण हात लावत न्हवते आज आपण पाहताच दिल्ली पासुन मुंबई पर्यंत देशाला लुटणार्यांना जेलच्या दरवाजापर्यंत नेणार हे तुम्हाला सांंगितले होते. देशाला लुटणार्‍यांकडून पैसे वसूल होत नाही तोपर्यंत हे अभियान सुरूच राहील.

२१ ऑक्टोबरला सुट्टी असेल तरी लोकतंत्राच्या उत्सवात आपण मैदानात उतरावे. पावित्र्य कर्तव्य पार पाडणे हे गर्वाचे काम आहे. माझ्या देशाच्या भलाई साठी करायचे. मी जे करतोय ते आपण दिलेल्या मताची ताकत आहे. लोकसभेच्या मतांचे रेकॉर्ड तोडला पाहीजे, असे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले. प्रकाश जावडेकर, गिरीश बापट, विजय शिवतारे, डॉ. नीलम गोर्‍हे, अमर साबळे यांची यावेळी भाषणे झाली. पक्षाचे प्रवक्ते उज्वल केसकर यांनी सूत्रसंचालन केले.

राज ठाकरे अभ्यासू, परंतु…-
राज ठाकरे अभ्यासू आहेत. परंतु आज ते शरद पवार हे जी लाईन देतील त्यावर बोलतात. अजित पवार यांनी मला चंपा म्हणून नाव ठेवले असेल तर त्यांनी दुसरे तर नाव ठेवायचे. त्यांनाही मी नाव ठेवू शकतो परंतु ती आमची संस्कृती नाही. आमच्या सरकारने केलेल्या विकासामुळे त्यांना बोलण्यासारखे काही राहिले नाही, असा टोला चंद्रकांत पाटील राज ठाकरे आणि पवार यांना लगावला.

‘त्यांनी’ एक तरी झाड लावले ? –
पर्यावरणावरून टीका करणार्‍यांनी शहरात एक तरी झाड लावले ? बिडीपी च्या आडून त्यांच्याच नगरसेवकांनी त्या टेकड्यांवर बेकायदा झोपड्या वसविल्या आहेत, असा आरोप शहर अध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार ऍड. वंदना चव्हाण यांचे नाव न घेता केला.

महत्वाचे मुद्दे –
1. काय पुणेकर कसे आहात ? अशी मराठीतून सुरूवात.
2. मोबाईलच्या टॉर्च लावून प्रेक्षकांचे मोदींना अभिवादन
3. राज्यातील प्रमुख विरोधक शरद पवार आणि कॉंग्रेसच्या नेत्यांचा नामोल्लेख टाळला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like