आर्थिक सर्वेक्षणामधील मोदी सरकारचे यश सांगणाऱ्या ‘या’ १० महत्त्वाच्या गोष्टी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केन्द्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी (ता.४) संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. हा अहवाल सरकारच्या कामकाजाचे मूल्यमापन दर्शवत असून या अहवालावरून उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचा अंदाज करता येऊ शकतो. सध्याच्या आर्थिक वर्षात GDP ची वाढ ७ टक्के असेल असा अंदाज वर्तविला आहे. या सर्वेक्षणात अशा अनेक गोष्टी होत्या. ज्या मोदी सरकारचे यश दर्शवितात. विशेषतः अर्थव्यवस्थेच्या संदर्भात सरकारची वाटचाल चांगली झालेली दिसत आहे.

आर्थिक सर्वेक्षणातील अशा १० गोष्टी खालीलप्रमाणे –

१. NPAs (अनुत्पादक मालमत्ता) च्या संदर्भात सरकारला मोठे यश मिळाले असून मार्च २०१८ मध्ये ११.५ % असणारे NPA डिसेंबर २०१८ मात्र मध्ये कमी होऊन १०. १ टक्के इतके झाले होते.

२. फिक्स्ड इन्वेस्टमेंट (निश्चित गुंतवणूक) मध्ये वाढ झाली असून २०१६-१७ मध्ये ८.३ टक्के असणारी ही गुंतवणूक २०१८-१९ मध्ये वाढून १०% इतकी झाली आहे.

३. रोजगारासंदर्भात देखील सरकारला मागील एका वर्षात यश मिळाल्याचे दिसून येत आहे. EPFO च्या माहितीनुसार औपचारिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. फेब्रुवारी २०१८ मध्ये ४.८७ लाख लोकांना रोजगार मिळाला होता. हाच आकडा मार्च २०१९ पर्यंत वाढून ८.१५ लाख इतका झाला होता.

४. मागील काही वर्षांच्या तुलनेत रुपयाचे मूल्य स्थिर आहे आणि GDP मध्ये वाढ होण्याची शक्यता दिसत आहे.

५. सध्या चालू खात्यातील तूट सकल घरेलू उत्पन्नाच्या (GDP) २.१ टक्के इतके आहे. हि गोष्ट दिलासादायक आहे.

६. राजकोषीय तूट २०१७-१८ मध्ये ३.५ टक्के इतकी होती तर २०१८-१९ मध्ये ३.४ टक्के झाली आहे.

७. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील जवळपास ९३.१ टक्के घरांमध्ये शौचालयाची सुविधा पुरविण्यात आली आहे.

८. मोदी सरकारच्या काळात रस्ते बनविण्याचा वेग वाढला आहे. २०१४-१५ मध्ये रस्ते बनविण्याचा वेग १२ किलोमीटर प्रतिदिवस इतका होता. तो २०१८-१९ या वर्षात वाढून ३० किलोमीटर प्रतिदिवस झाला आहे.

९. आरोग्यावर होणार सरकारी खर्च २०१४-१५ साली १.२ टक्के होता जो २०१८-१९ मध्ये वाढून १.५ टक्के इतका झाला आहे.

१०. शिक्षणावर होणार सरकारी खर्च २०१४-१५ मध्ये २.८ टक्के होता तर सध्या २०१८-१९ साली ०.२ टक्क्यांनी वाढून ३ टक्के इतका झाला आहे.

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

बहुजननामा

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव