‘लॉकडाऊन’मध्ये ‘सोन्या-चांदी’च्या दरात आणखी एकदा मोठी घट, जाणून घ्या 10 ग्रॅम 24 ते 18 कॅरेट Gold चा ताजा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज म्हणजे बुधवार 27 मे रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले. आज सकाळी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 46360 रुपयांवर आले आहे. शुक्रवारच्या तुलनेत आज सोने 539 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाले आहे. तर आज चांदी 705 रुपये प्रति किलो ग्रॅम घसरून 46920 रुपयांवर आली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची वेबसाइट सोने-चांदीच्या सरासरी किंमती अपडेट करते. यानुसार 27 मे 2020 रोजी सोने-चांदीचे दर अशाप्रकारे होते…

27 मे 2020 : सोने-चांदीचा ताजा भाव
धातु 27 मे रेट (रुपये/10 ग्रॅम) 22 मे रेट (रुपये/10 ग्रॅम) रेटमध्ये बदल (रुपये/10 ग्रॅम)

Gold 999 46260 46799 -539
Gold 995 46075 46617 -542
Gold 916 42374 42868 -494
Gold 750 34695 35099 -404
Gold 585 27062 27377 -315
Silver 999 46920 Rs/Kg 47625 Rs/Kg -705 Rs/Kg

तर 24 कॅरेट सोने म्हणजे गोल्ड 999 चा भाव मंगळवारच्या तुलनेत 539 रुपये स्वस्त झाला आहे. तर 23 कॅरेट सोने म्हणजे गोल्ड 995 मध्ये 542 रुपयांची घसरण दिसून आली. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 494 रुपये घसरून 42374 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन दिल्लीचे मीडिया प्रमुख राजेश खोसला यांच्यानुसार आयबीजेए देशभरातील 14 सेंटर्समधून सोने-चांदीचे करन्ट रेट घेऊन त्याचे सरासरी मुल्य सांगते. खोसला म्हणाले, सोने-चांदीचा करन्ट रेट अथवा म्हणा की, सध्याचा भाव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळा असू शकतो. परंतु, यांच्या किंमतीत खुप कमी अंतर असते.

पहिला जाणून घ्या सोन्याचा दर
जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी जात असाल तर खरेदी किंवा विक्रिपूर्वी सोन्याचा रेट जरूर जाणून घ्या. कोणीही व्यक्ती आयबीजेए म्हणजे इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनची वेबसाइट https://ibjarates.com/ वर जाऊन स्पॉटचा रेट जाणून घेऊ शकते. आयबीजेएद्वारे जारी करण्यात आलेले रेट देशभरात सर्वमान्य आहेत. मात्र, या वेबसाइटवर दिल्या गेलेल्या रेटमध्ये 3 टक्के जीएसटी जोडलेला नाही. सोन विकताना तुम्ही आयबीजेए रेटचा संदर्भ देऊ शकता. अगोदरच भाव माहित असल्यास ज्वेलरकडून तुम्ही चांगला भाव मिळवू शकता. असली सोने 24 कॅरेटचेच असते, परंतु त्याचे दागिने तयार होत नाहीत, कारण ते खुपच मऊ असते. दागिन्यांसाठी 22 कॅरेट सोने वापरले जाते, ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते.

ज्वेलरी खरेदी करताना हॉलमार्क जरूर पाहा
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रिच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मुल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

गोल्ड 999 म्हणजे काय ?
हॉलमार्कवाल्या ज्वेलरीवर हॉलमार्कचे निशाण आणि काही अंक जसे की 999, 916, 875 लिहिलेले असतात. याच अंकामध्ये तुमच्या सोन्याचे गुपित दडलेले असते. लक्षात ठेवा हॉलमार्कच्या निशाणासोबत 999 नंबरवाली सोन्याची ज्वेलरी 24 कॅरेटची असते. 999 चा अर्थ यामध्ये सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. अशाच प्रकारे 23 कॅरेट सोन्यावर 995, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेटवर 875, 18 कॅरेटवर 750 अंक उमटवलेले असतात.