खुशखबर ! सोन्याच्या दरांमध्ये कमालीची ‘घसरण’, जाणून घ्या 10 ग्रॅम Gold चा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय स्तरावर मौल्यवान धातूंच्या चढ-उतारांदरम्यान शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात मात्र सोन्याचे दर घसरल्याने सोने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोन्याचे भाव प्रतितोळा ७०० रुपयांनी घसरून ३८,४७० रुपयांवर गेले. मागील एका महिन्यातील हे सर्वात कमी भाव असून चांदीचे दर मात्र प्रति किलो १५० रुपयांनी वाढून ४८,५०० रुपये झाले आहेत.

हे आहेत जागतिक बाजारातील भाव :
जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार चालू आहे. काल स्थानिक पातळीवर अनंत चतुर्दशीनिमित्त आंतरराष्ट्रीय स्तरावर मौल्यवान धातूंच्या किमतीमध्ये घट झाली. त्या तुलनेत आज आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव ०.४३ टक्क्यांनी वधारून १५०५.११ डॉलर प्रति औंस होते. डिसेंबरमधील अमेरिकन सोन्याच्या वायद्यात कोणताही बदल झाला नाही आणि तो प्रति औंस १४९८.७० डॉलर इतका झाला. चांदीची किंमत ०.५२ टक्क्यांनी वाढून १८.१५ डॉलर प्रति औंस झाली.

१६ ऑगस्टनंतर सर्वात कमी किंमत :
स्थानिक बाजारपेठेत सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम ७०० रुपयांनी स्वस्त होऊन ३८,४७० रुपयांवर गेले, जी १६ ऑगस्टनंतर सोन्याच्या भावांची सर्वात नीचांकी पातळी आहे. सोना बितूर देखील प्रति १० ग्रॅम ३८,३०० रुपयांनी घसरला. आठ ग्रॅम असलेल्या गिन्नीचे भाव २०० रुपयांनी कमी होऊन ३०,००० रुपये झाले. चांदीचे दर १५० रुपयांनी वाढून ४८,५०० रुपये प्रति किलोवर बंद झाले. चांदीचा वायदा ५४० रुपयांनी घसरून ४७,२०० रुपये प्रतिकिलोवर आला.