चिखली – कुदळवाडी येथे फिल्टर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग

पिंपरी : पोलीसनामा आॅनलाइन – पिंपरी-चिंचवड मधील कुदळवाडी चिखली येथे फिल्टर बनवणाऱ्या कंपनीला रात्री बाराच्या सुमारास भीषण आग लागली. यात सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. कंपनीत कोणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. तब्बल साडेचार तासानंतर आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण आणले. यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. अक्षय सुरेश बाफना आणि सुरेश दलीचंद बाफना यांच्या मालकीची ही कंपनी आहे.

Pune | पुण्यात भल्या सकाळी दूध व्यावसायिकावर कोयत्याने सपासप वार ; गंभीर जखमी

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री बाराच्या सुमारास पंचशील फिल्टर्स या कंपनीला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे भीषण आग लागली. या घटनेची माहिती राजू गरजे नावाच्या सजग व्यक्तीने अग्निशमन दलाच्या विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या परंतु आग मोठी असल्याने पिंपरी, भोसरी, चिखली, तळवडे, प्राधिकरण, भोसरी एमआयडीसी, हिंजवडी, पुणे मनपा, या अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले. मात्र पाणी कमी पडत असल्याने अखेर बजाज कंपनी, टाटा मोटर्स, चिखली, कुदळवाडी, जाधववाडी, मोशी या ठिकाणच्या पाण्याचे टँकर पाणी पुरवठा करत होते अश्या एकून १५ ते २० टँकर आणि अग्निशमन दलाच्या गाड्याने आगीवर पहाटे साडेचार वाजता नियंत्रण मिळवले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे निष्पन्न झाले आहे. कंपनीत प्लाष्टीक आणि कागदाचे साहित्य मोठ्या प्रमाणावर होते ते आगीत जळून खाक झाले आहे.

पुणे | गोळीबार रुपेश पाटीलच्या साथीदाराने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न

या भीषण आगीमुळे कुदळवाडी चिखली परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करावा लागला होता. यामुळे आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर वर याचा परिणाम झाला होता. सदर कंपनीमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेले नाही. तसेच कंपनीमध्ये केवळ एकच सुरक्षा रक्षक होता अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.