शेतकर्‍यांची ‘कमाई’ वाढविण्यासाठी शास्त्रज्ञांकडून नवीन ‘शोध’, असा होणार थेट ‘फायदा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय वैज्ञानिक उपकरणे संस्था (सीएसआयओ), चंडीगड आणि हिमालय इन्स्टिट्यूट ऑफ जैव-संपदा संस्था (आयएचबीटी), पालमपूर वैज्ञानिकांनी शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. दोन्ही संस्थांच्या वैज्ञानिकांनी मधमाश्या पालनामध्ये वापरल्या जाणार्‍या पारंपारिक मधमाशांच्या पोळामध्ये सुधारणा करुन कृत्रिम नवीन मधमाशांचे पोळ विकसित केले आहेत, यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकेल आणि उत्पादनात देखील वाढ होईल.

वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, पारंपारिक पद्धतींपेक्षा या कृत्रिम मधमाश्यांचा उपयोग केल्याने कमी मेहनत लागते. यातून एका वर्षामध्ये 35 ते 40 किलो मध मिळू शकते. तर पारंपारिक मधमाशांतून 10 ते 25 किलो मध मिळते. नवीन विकसित केलेल्या कृत्रिम मधमाशांच्या पोळाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे फ्रेम आणि मधमाश्यांना त्रास न देता मध गोळा केले जाऊ शकते. या मधाची शुद्धता देखील पूर्वीच्या मधापेक्षा जास्त असते.

हिमालय जैव-संपदा प्रौद्योगिक संस्थान(आयएचबीटी) चे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. एस.जी. ईश्वरा रेड्डी यांनी इंडिया सायन्स वायरला सांगितले की, ‘या पोळाचा वापर केल्यास उत्तम स्वच्छता राखत मधमाश्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. मधाच्या पोळाची देखभाल ही एक समस्या आहे, ज्याच्यामुळे मधाची शुद्धता प्रभावित होतो.”

नवीन पोळ्यामध्ये काय विशेष आहे?
नव्याने विकसित केलेल्या कृत्रिम पेटीमध्ये मधमाशांचे पोळ तयार केले जाते. त्या पोळामधील मध पेटीच्या बाहेरच्या बाजुला असलेल्या तोटीमार्फत काढले जाते. यामुळे मध थेट बाटलीत प्रवाहित होते. अशाप्रकारे, मध अशुद्ध होण्यापासून वाचते आणि तिची गुणवत्ता देखील उच्च राहते.

भारतात मध उत्पादन किती आहे
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या काही वर्षांत भारत मध उत्पादन व निर्यातीच्या बाबतीत वेगाने पुढे आला आहे. भारत आपल्या उत्पादनाच्या बाबतीत जगातील आठवा प्रमुख देश आहे. हे दर वर्षी 1.05 लाख मेट्रिक टन मध उत्पादन करते. राष्ट्रीय मधमाशी बोर्डच्या अहवालानुसार, भारतात 14,12,659 मधमाशांच्या वसाहतींमध्ये एकूण 9,580 नोंदणीकृत मधमाशी पालन करणारे आहेत.

प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स निर्यात विकास प्राधिकरणाच्या अहवालानुसार, 2018-19 मध्ये भारताने 732.16 कोटी रुपयाचे नैसर्गिक मध निर्यात केले आहे. भारत याचे निर्यात अमेरिका, सौदी अरेबिया, मोरोक्को आणि कतार यासारख्या देशांमध्ये करतो.