Gold Price : सोन्याच्या देशांतर्गत आणि जागतिक ‘जाहीर’ दरात वाढ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या देशांतर्गत वायदा भावासह जागतिक हाजीर आणि जागतिक वायदा भावातही गुरुवारी वाढ झाली आहे. एमसीक्स एक्सचेंजवर गुरुवारी सकाळी ५ जून २०२० च्या सोन्याचा वायदा भाव ०.३४ टक्के म्हणजे १५५ रुपयाने वाढून ४५,५२६ रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेंड करत होता. याशिवाय एमसीक्सवर गुरुवारी सकाळी ५ ऑगस्ट २०२० च्या सोन्याचा वायदा भाव ०.१२ टक्के म्हणजे ५४ रु वाढून ४५,६४९ रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेंड करत होता.

एमसीएक्स एक्सचेंजवर चांदीच्या वायदा भावात गुरुवारी वाढ दिसून आली आहे. गुरुवारी सकाळी ३ जुलै २०२० च्या चांदीचा वायदा भाव ०.४१ टक्के म्हणजे १७० रुपयांनी वाढून ४२,०१५ रुपये प्रतिकिलोवर ट्रेंड करत होता.

आंतरराष्ट्रीय बाजारातही गुरुवारी सोन्याच्या वायदा आणि हाजीर बाजारात वाढ झाली. ब्लूमबर्गनुसार, गुरुवारी सकाळी सोन्याची जागतिक हाजीर किंमत ०.२७ टक्के म्हणजे ४.५३ डॉलरने वाढून १,६९०.२४ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होती. तसेच गुरुवारी सकाळी सोन्याचा जागतिक वायदा भाव कॉमेक्सवर ०.३३ टक्के म्हणजेच ५.५० डॉलरने वाढून १६९४ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता.

जागतिक पातळीवर चांदीच्याही हाजीर भावात आणि वायदा किमतीत गुरुवारी वाढ झाली. ब्लूमबर्गनुसार, गुरुवारी सकाळी चांदीचा जागतिक हाजीर भाव ०.९६ टक्के म्हणजे ०.१४ डॉलरने वाढून १५ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. तर चांदीचा जागतिक वायदा भाव कॉमेक्सवर गुरुवारी सकाळी ०.४७ टक्के म्हणजे ०.०७ डॉलरने वाढत १५.०९ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदी व्यतिरिक्त दुसऱ्याही मौल्यवान धातूंच्या भावात दरवाढ पाहायला मिळाली. गुरुवारी सकाळी प्लॅटिनमचा हाजीर भाव १.४० टक्के १०.५६ डॉलरने वाढून ७६३.९७ डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होता. तसेच पॅलेडियमचा हाजीर भाव १.०४ टक्के म्हणजे १८.७२ डॉलरने वाढून १८२२.६२ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता.