Gold Futures Price : सोन्या-चांदीच्या दरात कमालीची ‘तेजी’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मंगळवारी सकाळी सोन्या-चांदीच्या वायदामध्ये प्रचंड वाढ दिसून आली. एमसीएक्सवर मंगळवारी सकाळी, ५ जून २०२० च्या सोन्याच्या वायद्याच्या भाव ३.१२ टक्के म्हणजेच १३६५ रुपयांच्या जबरदस्त तेजीसह प्रति १० ग्रॅम ४५,०८७ रुपयांवर ट्रेंड करत होता. सोन्याबरोबरच चांदीच्या वायदा किंमतीतही मंगळवारी सकाळी प्रचंड वाढ झाली. एमसीएक्सवर ५ मे २०२० च्या चांदीच्या वायदा भाव मंगळवारी सकाळी ५.२६ टक्के म्हणजेच २१६७ रुपयांच्या जबरदस्त तेजीसह ४३,३९० रुपये प्रतिकिलोवर ट्रेंड करत होता. त्याशिवाय, ३ जुलै २०२० चा चांदीचा वायदा भाव एमसीएक्सवर मंगळवारी सकाळी ५.०१ टक्के म्हणजेच २०७३ रुपयांच्या वाढीसह प्रतिकिलो ४३,४२४ रुपयांवर होता. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, एमसीएक्सवर मंगळवारी सकाळी २० एप्रिल २०२०च्या कच्च्या तेलाची वायदा किंमत १.३५ टक्क्यांनी म्हणजेच २८ रुपयांच्या वाढीसह २०७६ रुपये प्रति बॅरलपर्यंत ट्रेंड करत आहेत.

जागतिक बाजारपेठेबद्दल बोलायचे झाल्यास मंगळवारी सकाळी सोन्याच्या स्पॉट प्राइसमध्ये किंचित घसरण दिसून आली. माहितीनुसार, मंगळवारी सकाळी जागतिक स्तरावर सोन्याची स्पॉट प्राईज ०.०४ टक्के म्हणजेच ०.६१ डॉलरने कमी होऊन ते प्रति औंस १,६६०.३६ डॉलरवर गेली. त्याचबरोबर मंगळवारी सकाळी चांदीच्या जागतिक किमतींमध्ये तेजी दिसून आली. मंगळवारी सकाळी चांदीचा भाव १.३२ टक्के म्हणजेच ०.२० डॉलरच्या वाढीसह १५.२० डॉलर प्रति औंसवर होता.

सोन्या-चांदीशिवाय अन्य मौल्यवान धातूंबद्दल बोलायचे झाल्यास, जागतिक पॅलेडियम स्पॉटची किंमत मंगळवारी सकाळी ०.३१ टक्के म्हणजेच ६.७४ डॉलरच्या घसरणीसह २,१५६.८१ डॉलर प्रति औंसवर बंद झाली. त्याच वेळी, प्लॅटिनमची जागतिक किंमत ०.८१ टक्के म्हणजेच ६.०२ डॉलरच्या घसरणीसह ७३४.४५ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने २५ मार्चपासून देशभरात २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाउन लागू केला आहे. लॉकडाऊनमुळे मंगळवारी देशातील सोन्याचे स्पॉट मार्केट बंद राहील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like