Gold Price Today : सोन्याच्या वायदा किंमतीत ‘घसरण’, चांदी करतेय सर्वोच्च स्तरावर ‘ट्रेंड’, जाणून घ्या किंमती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी वायदा बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर 5 ऑगस्ट 2020 च्या सोन्याची वायदा किंमत सोमवारी सकाळी 9 वाजून 37 मिनिटांनी 113 रुपयांच्या घसरणीसह प्रति 10 ग्रॅम 46,991 रुपयांनी ट्रेंड करीत होती. त्याशिवाय एमसीएक्स वर 5 ऑक्टोबर 2020 च्या सोन्याची वायदा किंमत सोमवारी सकाळी 9 वाजून 22 मिनिटांवर 98 रुपयांच्या घसरणीसह प्रति 10 ग्रॅम 47,140 रुपयांनी ट्रेंड करीत होती. त्याचबरोबर 5 जून 2020 च्या सोन्याची वायदा किंमत सोमवारी सकाळी 9 वाजून 6 मिनिटांवर 94 रुपयांच्या घसरणीसह प्रति 10 ग्रॅम 46,560 रुपयांनी ट्रेंड करीत होती.

वायदा बाजारात चांदीबद्दल बघितले तर चांदीच्या किंमतींनी सोमवारी नवा विक्रम प्रस्थापित केला. एमसीएक्सवर सोमवारी सकाळी 3 जुलै 2020 ची चांदीची वायदा किंमत 947 रुपयांनी वाढून 51,065 रुपये प्रति किलोग्रॅमच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर ट्रेंड करीत होती. याखेरीज 4 सप्टेंबर 2020 ची चांदीची वायदा किंमत सोमवारी सकाळी 945 रुपयांनी वाढून 51,697 रुपये प्रति किलोग्रॅमच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर ट्रेंड करीत होती.

आंतरराष्ट्रीय पातळीविषयी बोलायचे झाले तर सोमवारी सकाळी सोन्याच्या वायदा आणि स्पॉट किंमतीमध्ये तेजी दिसून आली. ब्लूमबर्गच्या मते सोमवारी सकाळी कॉमेक्सवर सोन्याची जागतिक वायदा किंमत 0.37 टक्के म्हणजेच 6.50 डॉलरच्या वाढीसह प्रति औंस 1758.20 डॉलरवर ट्रेंड करीत होती. त्याचबरोबर सोन्याची जागतिक पातळीवरील स्पॉट किंमत 0.68 टक्क्यांनी म्हणजेच 11.75 डॉलरच्या वाढीसह प्रति औंस 1,742.02 डॉलरवर ट्रेंड करीत होती.

आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोमवारी सकाळी चांदीच्या वायदा किमतीत आणि स्पॉटच्या किंमतींमध्ये वाढ दिसून आली. सोमवारी सकाळी चांदीची जागतिक स्पॉट किंमत 2.31 टक्क्यांनी किंवा 0.41 डॉलरच्या वाढीसह प्रति औंस 18.28 डॉलरवर ट्रेंड करीत होती. त्याचबरोबर चांदीची जागतिक वायदा किंमत कॉमेक्सवर सोमवारी सकाळी 2.28 टक्क्यांनी किंवा 0.42 डॉलरच्या वाढीसह प्रति औंस 18.92 डॉलरवर ट्रेंड करीत होती.