मोठी खुशखबर ! सोन्या-चांदीच्या दरात मोठी ‘कपात’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय स्तरावर आज सोन्यामध्ये घसरणं पाहायला मिळाली. दिल्ली सराफ बाजारात आज सोने 320 रुपयांनी स्वस्त होऊन 39,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर चांदीच्या किंमतीत देखील मोठी घसरणं पाहायला मिळाली आहे. आज चांदी 1,025 रुपयांनी घसरुण 46,875 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली आहे. यावर्षी 26 सप्टेंबरनंतर चांदीच्या दरात मोठी घसरणं पाहायला मिळाली. दोन्ही धातूंचे भाव कालपासून कमी होताना दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोने हाजिर 1.7 टक्क्यांनी घसरले होते. जे सप्टेंबरच्या उत्तरार्धात सर्वात महागले होते. आज दोन डॉलरच्या सुधारणेने 1,486.30 डॉलर प्रति औंस झाले आहे. डिसेंबरमध्ये अमेरिकी सोने वायदा बाजारात आज 2.90 डॉलरने चमकून 1,486.60 डॉलर प्रति औंस झाले.

बाजार विश्लेषकांनी सांगितले की जगातील इतर प्रमुख चलनाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्याने आणि अमेरिकेत बॉन्डवर व्याज वाढल्याने गुंतवणूकदार गुंतवणूक बाजारात जोखीम उचलण्याचे साहस दाखवत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक समजल्या जाणाऱ्या सोन्याचे आकर्षण कमी होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी हाजिर 0.02 डॉलरने घसरुण 17.54 डॉलर प्रति औंस झाली.

Visit : Policenama.com