विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाआधी ‘हे’ 7 दिग्गज नेते करणार भाजपात प्रवेश !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. तर अनेक नेते पक्ष प्रवेशाच्या तयारीत आहेत. विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाआधी राज्यातील 7 दिग्गज नेते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपात प्रवेश करणारे नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

येत्या 1 सप्टेंबर रोजी राज्यातील दिग्गज नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडीक यांचा प्रवेश निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहेत. हे सर्वजण भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

भाजपा प्रवेशाचा उर्वरित दुसऱ्या टप्प्यात होणार असून 5 ते 10 सप्टेंबर या दरम्यान आणखी नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, सत्यजित देशमुख यांचा समावेश आहे. भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपा नेत्यांच्या संपर्कात आहेत. 5 तारखेला दिल्लीत होणाऱ्या बैठकीनंतर त्यांच्या पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –