अंडरवेअर काढून ‘त्यानं’ अंघोळीसाठी घेतली तलावात उडी, प्रायव्हेट पार्टमध्ये घूसला ‘जळू’ अन् काढलं रक्त शोषून, झाले ‘बेकार’ हाल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : तलावामध्ये आंघोळ करण्याची एक वेगळीच मजा आहे. थंड – थंड पाण्याने आंघोळ केल्याने सर्व थकवा दूर होतो. परंतु काही अशा घटना घडतात, ज्या अत्यंत भयंकर असतात. कंबोडियामधून अशीच एक घटना समोर आली आहे. एक व्यक्ती मजा म्हणून तलावात अंघोळीला गेला. परंतु त्यावेळी त्याच्या अंगात रक्त पिणारा जळू शिरला. असह्य होणाऱ्या वेदनेने व्यक्ती जोपर्यंत रुग्णालयात जाते, जळूने त्याचे सर्व रक्त पिले होते. बरीच मेहनत घेतल्यानंतर डॉक्टरांनी जळूला त्याच्या शरीरातून बाहेर काढले. काढून टाकण्यापूर्वी डॉक्टरांनी लांब काठीने पहिल्यांदा जळूला मारले, तेव्हा कुठे त्या जळूने त्या व्यक्तीची कातडी सोडली. एका जळूने त्याची प्रकृती अधिकच खराब केली.

कंबोडिया शल्यचिकित्सकांनी त्या माणसाच्या मूत्राशयातून एक मोठा जळू काढून टाकला. जेव्हा तो तलावामध्ये आंघोळ करायला गेला तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात जळू शिरला. दरम्यान या व्यक्तीची ओळख लपविली गेली आहे. 22 जून रोजी त्याला कंबोडियाची राजधानी फनो पेन येथे दाखल करण्यात आले. शौचावेळी त्याला खूप वेदना होत होत्या. व्यक्तीला का त्रास होत आहे? हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांनी त्याच्या खासगी भागात कॅमेरा लावला. तेेव्हा त्यांना धक्का बसला. आतमध्ये मोठा जळू चिटकून बसला होता. डॉक्टरांनी त्याला विचारले असता तो कपड्यांशिवाय तलावात स्नान करण्यास गेल्याचे आढळले. त्याच वेळी जळूने व्यक्तीच्या खाजगी भागात प्रवेश केला.

डॉक्टरांनी सांगितले की, जळू जेव्हा त्याच्या शरीरात शिरला तेव्हा त्याचा आकार लहान होता. आत गेल्यानंतर रक्त शोषल्याने त्याचा आकार वाढला. बऱ्याच प्रयत्नांनंतर डॉक्टरांनी त्या व्यक्तीच्या मूत्राशयातून जळू बाहेर काढला.

या बातमीनंतर डॉक्टरांनी लोकांना अंडरवेअरशिवाय तलावात प्रवेश करू नये अशी विनंती केली आहे. ते म्हणाले की, हा हंगाम जळूसाठी योग्य आहे. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.