मराठा आंदोलनाने एसटीचे मोठे नुकसान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर आलेल्या मराठा समाजातील तरुणांनी आपला राग काढण्यासाठी एसटीला लक्ष्य केले असून गेल्या चार दिवस अनेक एस टी गाड्यांची तोडफोड झाल्याने एसटी महामंडळाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

[amazon_link asins=’B01LXHKR4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2e01b118-8ef3-11e8-9508-53c3d79ce9e0′]

राज्यात गेल्या ४ दिवसात ६३ एस टी बसगाड्याचे नुकसान झाले आहे. तसेच या आंदोलनामुळे अनेक ठिकाणच्या गाड्या रद्द कराव्या लागल्याने त्यामुळेही महसुल बुडला आहे. पुणे-औरंगाबाद महामार्गावर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरु केल्याने प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन या मार्गावरील एस टी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या आंदोलनाची तीव्रता मराठवाड्यात सर्वाधिक असल्याने त्या भागात एस टीचे मोठे नुकसान झाले आहे. आज बंदची हाक दिल्यामुळे एस टी महामंडळाने अनेक मार्गावरील एस टी गाड्या रद्द केल्या आहेत.

दरम्यान, सातारा, सोलापूर, पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तर बुधवारी (२५ जुलै) मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गेलेल्या वारकऱ्यांना घरी परतण्यास अडथळा ठरू नये, म्हणून  सातारा,  पंढरपूर, पुणे आणि मुंबईला महाराष्ट्र बंदमधून वगळण्यात आले आहे.