दिल्ली – NCR मध्ये पुन्हा-पुन्हा भूकंप मोठया धोक्याचा ‘इशारा’, जमीनीखाली होतायेत ‘हे’ बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशाची राजधानी आणि तिच्या आजूबाजूच्या परिसरात कधीही मोठा भूकंप येण्याची शक्यता वरिष्ठ संशोधकांनी व्यक्त केली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये मागील एक महिन्यात लागोपाठ छोटे-छोटे भूकंपाचे अनेक धक्के बसले आहेत. भूकंपावर लक्ष ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था द नॅशनल सेंटर ऑफ सीसमोलॉजीने सांगितले की, 12 एप्रिलपासून 29 मेपर्यंत दिल्ली-एनसीआरमध्ये 10 भूकंपाचे झटके बसले आहेत.

नुकताच नोएडामध्ये रात्री 3.2 तिव्रतेचा झटका जाणवला होता. मागच्या पाच दिवसात तीनवेळा झटके जाणवले आहेत. अखेर दिल्ली-एनसीआरच्या जमीनीखाली हे काय होत आहे, दुसर्‍या ठिकाणी येत असलेल्या भूकंपामुळे दिल्ली-एनसीआर थरथरत आहे का, असे प्रश्न विचारले जात आहेत. आता लोक भितीपोटी सोशल मीडियावर इमर्जन्सी किट/बॅग ठेवण्याचा सल्ला देत आहेत. भूकंपापासून वाचण्याच्या पद्धती सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जवाहरलाल नेहरू सेंटर ऑफ अ‍ॅडव्हान्स सायंटिफिक रिसर्चमध्ये प्रोफेसर सीपी राजेंद्रन यांनी शंका व्यक्त केली आहे की, दिल्ली-एनसीआरमध्ये केव्हाही मोठा भूकंप येऊ शकतो. परंतु, तो केव्हा येईल आणि किती ताकदवान असेल, हे सांगणे अवघड आहे. राजेंद्रन यांनी हे एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

सीपी राजेंद्रन यांनी 2018 मध्ये एक स्टडी केला होता. ज्यानुसार 1315 आणि 1440च्या दरम्यान भारताच्या भाटपुरपासून नेपाळच्या मोहाना खोलापर्यंत 600 किलोमीटर लांब सीसमिक गॅप तयार झाली आहे. म्हणजे जमीनीच्या आत एक मोठी गॅप तयार झाली आहे. हा एक सक्रिय भूकंपीय फॉल्ट आहे.

सीपी राजेंद्रन यांनी सांगितले की, या गॅपमध्ये सामान्यपणे कोणतीही हालचाल दिसत नाही. यावर छोटे-छोटे झटके बसत राहातात. मागील 600-700 वर्षांपासून हे गॅप शांत आहेत. परंतु, यावर लागोपाठ भूकंपीय दबाव तयार होत आहे. हा दबाव भूकंप म्हणून समोर येऊ शकतो. जर येथून भूकंप आला तर तो 8.5 तिव्रतेचा असू शकतो.

जर दिल्ली-एनसीआर क्षेत्रात 8.5 तीव्रतेचा भूकंप आल्यास भयंकर विनाश होऊ शकतो. दिल्ली-एनसीआरच्या खाली 100 पेक्षा जास्त लांब आणि खोल फॉल्ट्स आहे. यामधील काही दिल्ली-हरिद्वार रिज., दिल्ली-सरगोधा रिज. आणि ग्रेट बाउंड्री फॉल्टवर आहे. यासोबतच अनेक सक्रिय फॉल्ट्ससुद्धा यामध्ये आहेत.

हे सर्व फॉल्ट्स हिमालयाच्या टेक्नोनिक प्लेटला लागून आहेत, अशात हिमालयाच्या टेक्टोनिक प्लेटमध्ये होणार्‍या बदलांमुळे दिल्लीच्या जवळपासचे फॉल्ट्स हालतात किंवा थरथरतात. ज्यांच्यामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे झटके जाणवतात.

हिमालयन टेक्टोनिक प्लेटच्या खाली होत असलेल्या या हालचालींमुळे जमिनीच्या आत दाब तयार होतो. हा दाब रिलीज होतो तेव्हा भूकंप येतो. हे छोटे असू शकतात आणि भयंकरसुद्धा असू शकतात. असाच दाब रिलीज होण्याचा परिणाम होता 29 मे रोजी रोहतकमध्ये आलेला 4.6 तीव्रतेचा भूकंप.

दिल्ली आणि जवळपासच्या परिसरात असे भूकंप यापूर्वी सुद्धा आले आहेत. 1960 मध्ये दिल्लीत 4.8 तीव्रतेतचा भूकंप आला होता. दिल्लीतील 75 टक्के इमारती त्यावेळी थरथरल्या होत्या. उत्तर कँटपासू गुरुग्रामपर्यंत जमीनीत भेगा पडल्या होत्या. लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवनाचे सुद्धा नुकसान झाले होते. 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.

दिल्लीच्या जवळपास सध्याच्या फॉल्ट्समुळे 6.5 तीव्रतेपर्यंतचा भूकंप येऊ शकतो. सीपी राजेंद्रन यांनी सांगितले की, सेंट्रल हिमालयन फुटहिल्समध्ये मोठ्या भूकंपाची शक्यता आहे. कारण या भागात शेकडो वर्षांपासून एकही भूकंप आलेला नाही. हे खुप शांत आहे. हिच बाब खुप भयंकर आहे.

राजेंद्रन म्हणाले, इंडियन प्लेट सतत उत्तरेकडे सरकत आहे. यामुळे हिमालयामध्ये दाब निर्माण झाला आहे. ज्या दिवशी हा दाब रिलिज होईल, एक भयंकर भूकंप किंवा लागोपाठ काही भूकंप येऊ शकतात. पण हे केव्हा होईल हे सांगणे खुप अवघड आहे.

राजेंद्रन यांनी सांगितले की, यमुना नदीची माती अशी आहे जिच्यावर भूकंपाचा धोका जास्त आहे. यामुळे इमारतींना धोका निर्माण होऊ शकतो. जर हिमालयाकडून भूकंपाचे झटके आले तर गंगेचा मैदानी प्रदेश आणि यमुनाचा परिसरात अतिशय मोठ्याप्रमाणात प्रभावित होईल.

हिमालयाकडून भूकंप आल्यास दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, गढवाल आणि कुमाऊं क्षेत्रावर जास्त परिणाम होईल. दिल्ली सीसमिक झोन 4मध्ये आहे. म्हणजे जास्त धोकादायक आणि संवेदनशील परिसरात आहे. भूकंप आला तर तो दिल्ली एनसीआरमध्ये भयंकर विनाश करू शकतो.

भूकंपाच्या मापनासाठी भारताला झोन 2, झोन 3, झोन 4 आणि झोन 5 मध्ये विभागण्यात आले आहे. राजधानी दिल्ली आणि तिच्या जवळपासचा परिसर दिल्ली आणि त्याच्या जवळचा परिसर झोन 4 मध्ये येतो. हा तो झोन आहे, जेथे 7.9 तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो. अनेक रिपोर्ट सांगतात की, भूकंपाच्या दृष्टीने दिल्ली खुप संवेदनशील भाग आहे.