Big Movie Release : ‘द व्हाईट टायगर’, ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ सहित आज रिलीज होताहेत ‘हे’ 3 शानदार सिनेमे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  या आठवड्यात तीन शानदार सिनेमे रिलीज होणार आहेत. यात ऋचा चड्ढा हिचा मॅडम चीफ मिनिस्टर हा सिनेमाही समाविष्ट आहे. याशिवाय प्रियंका चोपडा आणि राजकुमार राव यांचा सिनेमा द व्हाईट टायगर आणि दिव्येंदू शर्मा यांचा सिनेमा मेरे देश की धरती आज रिलीज होणार आहे. या तीनही सिनेमांचा ट्रेलर देखील कमाल आहे.

1) मॅडम चीफ मिनिस्टर

बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस ऋचा चड्ढा (Richa Chadda) चा आगामी सिनेमा मॅडम चीफ मिनिस्टर (Madam Chief Minister) सतत चर्चेत येताना दिसत आहे. आज हा सिनेमा रिलीज होत आहे. या सिनेमाबद्दल सतत सवाल केले जात आहेत. हा सिनेमा एक पॉलिटीकल ड्रामा आहे. सिनेमाची स्टोरी तशी तर काल्पनिक आहे. यात ऋचा चड्ढाही इफेक्टीव रोलमध्ये दिसत आहे. अनेक विवादांनंतर आता हा सिनेमा रिलीजसाठी तयार आहे.

2) द व्हाईट टायगर –

द व्हाईट टायगर या सिनेमामुळंही वाद निर्माण झाला होता. या सिनेमावर कॉपीराईटचे आरोप लावण्यात आले होते. इतकंच नाही तर या रिलीजवर स्टेसाठीही नेटफ्लिक्सला अपील करण्यात आलं होतं. परंतु दिल्ली हायकोर्टानं याला नकार दिला. कोर्टानं सांगितलं रिलीजच्या 24 तास आधी यावर स्टे लावण्याचं काही कारण नाही. आजच हा सिनेमा रिलीज होत आहे. द व्हाईट टायगर या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा अरविंद अडिग यांच्या पुस्तकावर आधारीत आहे. पुस्तकाचं नाव देखील द व्हाईट टायगर हेच आहे जो 2008 सालीच रिलीज झाला होता. अरविंद अडिग यांना यासाठी पुरस्कार देखील मिळाला होता. प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) आणि राजकुमार राव हे या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.

3) मेरे देश की धरती

मेरे देश की धरती हा सिनेमाही आजच रिलीज होत आहे. हा एक देशभक्ती ड्रामा आहे. याचं डायरेक्शन फराज हैदरनं केलं आहे. यात दिव्येंदू शर्मा आणि अनुप्रिया गोयनका प्रमुख भूमिकेत दिसेल.