मेगाभरती पार्ट 2 : राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यासह आघाडीतील ‘या’ 5 दिग्गजांचा 8 ऑगस्टला भाजपात प्रवेश ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभेच्या तोंडावर भाजपमध्ये अनेक आमदारांनी प्रवेश केला असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन आमदार आणि एका काँग्रेस आमदाराचा देखील यामध्ये समावेश आहे. या आमदारांमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार भाजपमध्ये प्रवेश करत असताना आता पुन्हा ८ ऑगस्ट रोजी देखील भाजपमध्ये काही नेते प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. उततर महाराष्ट्रातील अनेक नेते भाजपमध्ये या दिवशी प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे माजी राज्यमंत्री अमरीश पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, अक्कलकुवाचे आमदार के सी पाडवी, त्याचबरोबर काँग्रेसचे धुळ्यातील आमदार कुणाल पाटील, राजवर्धन कदमबांडे हे नेते भाजपमध्ये ८ तारखेला प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. मागील आठवड्यात या नेत्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुले आता यातील किती जण भाजप प्रवेश करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, या आमदारांच्या पक्ष बदलणे अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादीच्या अडचणीत अजून वाढ होण्याची चिन्हे दिसून येत आहे. त्यामुळे आता शरद पवार हे डॅमेज कंट्रोल कसे नियंत्रित करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like