मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ 7000 शिक्षकांची जाऊ शकते नोकरी, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्राथमिक शाळामंध्ये काम करणाऱ्या शिक्षकांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे, कारण महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये काम करणाऱ्या जवळपास 7000 शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे. हा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जारी केला आहे. वास्तवात हा आदेश त्या शिक्षकांसाठी आहे जे शिक्षक शिक्षक पात्रता परिक्षेत (TET) पास झालेले नाहीत. राज्यात असे 7000 पेक्षा जास्त शिक्षक आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने एका निर्णयात 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शिक्षकांना टीईटी परिक्षा पास करणे अनिवार्य करण्याला समर्थन दिले आहे. आणि सांगितले की, राज्य सरकारने या निर्णयानुसार पावले टाकावीत.

शिक्षण मार्गदर्शनाच्या नियमानुसार जे प्राथमिक शिक्षक 30 मार्च 2019 पर्यंत टीईटी परिक्षा पास झालेले नाहीत. त्यांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागेल. यासंबंधित राज्यातील विविध शिक्षकांनी याचिका दाखल केली होती, ज्यावर मुंबई उच्च न्यायलयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. आणि सांगितले की राज्य सरकारने आपल्या निर्णयानुसार पावले टाकावीत.

उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले की शिक्षणातील गुणवत्तेच्या सुधारण्यासाठी या प्रकारचे नियम असणे अनिवार्य आहे. शिक्षक पदावर योग्य उमेदवारांची निवड झाली पाहिजे, जेणेकरुन शिक्षणाच्या दर्जात सुधारणा होईल. त्याच उमेदवारांकडून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा ठेवली जाऊ शकते ज्यांनी ही अनिवार्य पात्रता परिक्षा पास केली आहे.