दारून पराभव झाल्याने राहुल गांधीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्याने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आहे. अमेठी लोकसभा मतदार संघातून राहुल गांधी हे पराभूत होत आहेत. भाजपच्या स्मृती इराणी यांच्या विजयाची निवडणुक अधिकार्‍यांनी अधिकृत घोषणा करण्यापुर्वीच राहुल गांधी यांनी स्मृती इराणी यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काही वेळातच राहुल गांधी यांनी अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आले आहे.

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकी दरम्यात तब्बल 115 ठिकाणी जाहिर सभा, रोड शो केले. त्यापैकी केवळ 30 जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडुन आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्‍ली, मध्यप्रदेश, राजस्थान, सिक्‍कीम राज्यात काँग्रेसला खाते देखील उघडता आले नाही. गेल्या 10 वर्षाच्या काँग्रेसच्या इतिहासात निवडणुकीत पराभव झाल्यामुळे कोणत्याही काँग्रेसच्या अध्यक्षकांनी राजीनामा दिलेला नव्हता. मात्र, राहुल गांधी यांनी आता राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती काँग्रेसमधील सुत्रांनी दिली आहे. काँग्रेस कार्यकारणी राहुल गांधी यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव स्विकारणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, केरळमधील वायनाड लोकसभा मतदार संघातून राहुल गांधी मोठया मताधिक्क्याने विजयी झालेले आहेत.