‘ड्रॅगन’विरूध्द मोदी सरकार कठोर झाल्याचा दिसला परिणाम, चीनच्या सेंट्रल बँकेने कमी केली HDFC मधील ‘हिस्सेदारी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर चीनच्या सेंट्रल बँक पीपल्स बँक ऑफ चायनाने एचडीएफसीतील हिस्सेदारी खरेदी केल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती. त्यावेळी सरकारने एफडीआय नियमही कडक केले होते. त्याच कठोर उपाययोजनांमुळे चीनच्या सेंट्रल बँक पीपल्स बँक ऑफ चायनाने भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील हाऊसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसीमधील आपला हिस्सा कमी केला आहे. एप्रिलमध्ये पीपल्स बँक ऑफ चायनाने एचडीएफसीमध्ये १.०१ टक्के हिस्सा ३,३०० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह खरेदी केला होता.

चीनच्या सेंट्रल बँकेने HDFC मध्ये किती हिस्सा विकला
एका वृत्तसंस्थेनुसार, एचडीएफसीने शेअर बाजाराच्या एक्सचेंजला दिलेल्या माहितीत सांगितले गेले आहे की, सेंट्रल बँक ऑफ चायनाने एचडीएफसीतील आपला कमीतकमी काही हिस्सा विकला आहे. एक्सचेंजला देण्यात आलेल्या माहितीत म्हटले गेले की, जून अखेरपर्यंत चीन सेंट्रल बँकेने १% हिस्सा कमी केला आहे. पीबीओसीने आपले शेअर्स खुल्या बाजारात विकले आहेत. एका वृत्तसंस्थेनुसार, काही दिवसांपूर्वी म्हटले होते की एचडीएफसीच्या शेअरमध्ये आलेली घट यामुळे झाली आहे. एचडीएफसीचे शेअर्स रेकॉर्ड स्तरावरून ४० टक्के घसरून आपल्या एप्रिलच्या नीचांकी पातळीवर आले होते, परंतु आता थोडी रिकव्हरी झाली आहे.

चीनने HDFC मध्ये का विकला हिस्सा?
तज्ञांचे म्हणणे आहे की, पीपल्स बँक ऑफ चायनाने भारतातील नाराजीला बळी पडू नये म्हणून हिस्सा एक टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

चीनच्या हिस्सा खरेदी करण्याने भारतीय कंपन्यांना भीती का होती?
एचडीएफसीमध्ये चीनच्या पीपल्स बँकने केलेली गुंतवणूक फारशी नसली, तरी कोरोनामुळे चिनी कंपन्या भारतीय बाजारातील मंदीचा कसा फायदा घेतील याची चिंता बाजारपेठेत होती. म्हणूनच भारतीय कंपन्यांच्या सक्तीने अधिग्रहण करण्याचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने परकीय गुंतवणूकीचे नियम (एफडीआय-फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट) कडक केले.

भारतीय कंपन्यांचे होऊ शकते जबरदस्तीने अधिग्रहण
जर सोप्या शब्दात सांगायचे तर कोरोना विषाणूमुळे बर्‍याच मोठ्या आणि छोट्या कंपन्यांचे बाजार मूल्य घटले आहे. अशा परिस्थितीत ओपन मार्केटमधून त्यांचे शेअर्स खरेदी करून मॅनेजमेंट कंट्रोल केले जाऊ शकते. म्हणूनच सरकारने नियम कठोर केले आहेत. सध्या एचडीएफसीमध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा सर्वात जास्त ५.३९% टक्के हिस्सा आहे.