मोदी सरकारचा एक निर्णय चीनला पडेल महागात, होईल मोठे नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मोदी सरकार चीनमधून आयात केलेल्या Aniline Oil वर अँटी डम्पिंग शुल्क लावणार आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या शिफारशीनुसार अँटी डम्पिंग शुल्क लागू केले जाईल. Aniline Oil चा वापर औषध, फार्मा आणि डाई उद्योगात केला जातो. भारत दरवर्षी चीनकडून ९० ते ९५ केएमटी Aniline Oil आयात करतो. देशात ९८ टक्के Aniline Oil चीनकडून आयात केले जाते. वाणिज्य मंत्रालयाने Aniline Oil वर १५०.८० डॉलर/ एमटी अँटी डम्पिंग शुल्काची शिफारस केली आहे.

गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर्स अँड केमिकल्स (जीएनएफसी) यांनी सरकारकडे तक्रार केली होती की, चीन आणि इतर देशांकडून Aniline Oil आयात केल्याने देशांतर्गत उद्योगांचे नुकसान होत आहे. जीएनएफसीच्या तक्रारीवरून व्यापार मंडळाच्या महासंचालकांनी जानेवारीत हा तपास सुरू केला होता. त्यांनी जवळजवळ सहा महिने कठोर चौकशी केली आणि तपासणीनंतर त्यांनी ५१ पानांचा अहवाल वाणिज्य मंत्रालयाला सादर केला.

वाणिज्य मंत्रालयाने चीनी कंपनीवर प्रति मेट्रिक टन ५६ डॉलर्स आणि इतर कंपन्यांना प्रति मेट्रिक टन १५१ डॉलर्सची अँटी डम्पिंग शुल्क लावण्याची शिफारस केली आहे. आता हा संपूर्ण प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे आहे आणि ते लवकरच यावर निर्णय घेतील आणि एक ते दोन दिवसात याबाबत निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

वाढू शकते २५ वस्तूंवर अँटी-डम्पिंग शुल्क

सरकार देशांतर्गत कंपन्यांना चालना देण्यासाठी चीनकडून आयात केलेल्या २५ वस्तूंवर अँटी-डम्पिंग शुल्क वाढवू शकते. कॅल्क्युलेटर आणि यूएसबी ड्राईव्ह ते स्टील, सोलर सेल आणि व्हिटॅमिन-ई पर्यंत दोन डझनहून अधिक चिनी वस्तूंवर अँटी डम्पिंग शुल्क यावर्षी संपत आहे.