एकनाथ खडसेंना मंत्रिपद नाही ? ‘महाविकास’मध्ये धुसफूस !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसे (eknath-khadse) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश (ncp-entry) करणार आहेत. मात्र खडसेंचे पुनर्वसन करणार कस, असा प्रश्न राष्ट्रवादीसमोर असणार आहे. खडसेंना कृषीमंत्रीपद देण्यात येईल, असे सांगितले जात होते. परंतू शिवसेना कृषी खाते सोडण्यास तयार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर आता खडसेंच्या पुनर्वसनाचे आव्हान असणार आहे.

सध्या जरी खडसे यांना मंत्रीपद देण शक्य नसले तरी नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद त्यांना दिल जाऊ शकते. या पदाला कॅबिनेट दर्जा आहे. नियोजन मंडळाचे पद देऊन खडसेंना ताकद देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होऊ शकतो, असा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे. खडसे यांचे शिवसेनेसोबत चांगले संबध नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी ग्रामीण भागााशी कनेक्ट असलेले कृषी खाते का सोडायचे असा प्रश्न शिवसेनेत निर्माण झाला आहे. जर शिवसेनेने कृषी खात सोडले नाही. तर खडसेंना गृहनिर्माण खात दिल जाईल, असे सांगितले जात आहे.

परंतू जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण खाते सोडण्यास अनुकूल नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तुर्तास खडसेंना ताकदीचे पद देण्याबाबत प्रतिक्षा केली जाईल. विरोधी पक्ष भाजपला रोखण्यासाठी खडसें यांचा वापर करणार आहे. त्यामुळे खुद्द शरद पवार शिवसेनेला खातेबदल करण्यास तयार करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You might also like