‘भाईजान’ सलमान खान पुन्हा एकदा कोर्टाची पायरी ‘चढणार’, पत्रकारास केलेली मारहाण ‘भोवणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि वादविवादांचे जुने नाते आहे. सलमानने अनेकदा कोर्टात चकरा मारल्या आहेत. आता पुन्हा एकदा सलमान खान अडचणीत आला आहे. संकटाची सावट सलमान खानवर सारखी पडत असते. पुन्हा एकदा त्याला याचा सामना करावा लागत आहे. सलामान खानच्या विरोधात मुंबईच्या एका पत्रकाराने अनेक आरोप लावून तक्रार नोंदविली आहे. याबाबतीत एएनआईने ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आहे.

यामध्ये सांगितले की, सलमान खानच्या विरोधात पत्रकार अशोक पांडेयने आपराधिक तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीमध्ये सलमान खानवर लुटमार, हिंसा, आपराधिक गतिविधी आणि धमकीचा आरोप लावला आहे. पत्रकाराने सलमान खानचा सायकल चालवितानाचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी ही घटना घडली. पत्रकार अशोक पांडेयने अंधेरीच्या अतिरिक्त मुख्य मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट आर आर खानच्या न्यायालयात भारतीय दंड संहिता ३२३ ( दुखापत ), ३९२ (लुटणे) आणि ५०६ ( आपराधिक धमकी) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनूसार, घटना २४ एप्रिल रोजी सकाळी घडली होती. जेव्हा सलमान खान सायकल चालवित होता आणि त्याचे दोन बॉडीगार्ड त्याच्यासोबत होते. पत्रकार पांडेय म्हणाले की, ते कार मधून जात होते आणि अभिनेत्याला पाहून पांडेय यांनी त्याच्या बॉडीगार्डची परवानगी घेऊन सलमानचा व्हिडिओ काढायला लागले. यावरुन सलमान संतापला आणि आपल्या बॉडीगार्डला घेऊन त्यांच्या कारजवळ जाऊन त्यांना मारायला सुरुवात केली.

पांडेय यांचा आरोप आहे की, सलमान खानने बॉडीगार्डसोबत त्यांना मारायला सुरुवात केली आणि त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. पुढे त्यांनी सांगितले की, पोलिसांनी त्यांची तक्रार लिहून घेतली नाही. यानंतर त्यांना न्यायालयात जाण्याची वेळ आली. प्राथमिक तपास करण्याच्या त्यांच्या मागणीवर १२ जुलै रोजी न्यायाधिश निर्णय घेणार आहेत. याआधी देखील सलमान खान हरिणच्या शिकारीमुळे अडचणीत आला होता. याव्यतिरिक्त काही दिवसांपुर्वी तो बॉडीगार्डला चापट मारल्याबद्दलही चर्चेमध्ये आला होता. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

आरोग्य विषयक वृत्त

पुण्यात इनामदार हॉस्पिटल तर्फे वारकऱ्यांसाठी विनामूल्य आरोग्य शिबीर

शहरातील ६० टक्के नागरिक घेतात फक्त ५ तासाची झोप, मधुमेह व मेंदूविकारात वाढ

आरोग्यसेवेत केरळ नंबर १ वर, महाराष्ट्राचे स्थान कितवे ?

‘हे’ खाद्यपदार्थ सेवन केले तर कर्करोगापासून होईल संरक्षण