नोकरदारांसाठी खुशखबर ! ‘EPFO’ आगामी 7 दिवसात तुमच्या पैशाशी निगडीत घेणार मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरदारांना भविष्य निर्वाह निधी संंघटनेकडून (EPFO) येणाऱ्या ७ दिवसात खुशखबरी मिळू शकतात. केंद्र सरकार EPFO चे व्याजदर ८.६५ टक्के करण्याचे नोफिकेशन जारी करु शकते. परंतू अजून अर्थमंत्री आणि श्रम मंत्रालयाने व्याजदर निश्चितीवर सहमती झालेली नाही. आता मात्र व्याज दर वाढवण्यात येण्यावर सहमती झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या ७ दिवसात लवकरच नोटीफिकेशन जारी होऊ शकते.

२०१७-१८ या वित्त वर्षात ईपीएफवरील व्याजदर ८.५५ टक्के होते, आता ते वाढून ८.६५ टक्के केले जाऊ शकते. जर नोटीफिकेशन जारी केले तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधील जमा रक्कमेवर ८.६५ टक्के व्याज मिळेल.

२०१८-१९ ला पीएफ वर ८.६५ टक्के व्याज देण्यात येते तर EPFO कडे १५१ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम शिल्लक आहे. ८.६५ टक्के हे व्याजदर सरकारच्या इतर छोट्या बचत योजनापेक्षा अधिक आहे. ईपीएफओमध्ये ६ कोटी सक्रिय सदस्य आहे. ही संघटना ११ लाख कोटी रुपयापेक्षा अधिक रिटायरमेंटची सेविंगचे व्यवस्थापन करते.

ईपीएफओला वाटत आहे की खातेधारकांना वाढते व्याज मिळावे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंजूरी दिल्यानंतर श्रम मंत्रालयाने मेमोरेंडममध्ये सांगितले होते की, IL&FS मध्ये गुंतवणूकीचा विचार करता फंडमध्ये नुकसान झाले होते. यानंतर श्रम मंत्रालयाने २०१८-१९ साठी पीएफच्या व्याजदरावर पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like