क्रेडिट कार्ड धारकांना बँकांकडून मोठा झटका ! आता पुर्वीपेक्षा कमी करून शकाल कार्डव्दारे ‘खर्च’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे देशातील सर्व लोकांची आर्थिक परिस्थिती डगमगली आहे. यामुळे कुणाचा व्यवसाय रखडला आहे तर कुणाचा पगार कापला जात आहे. अशातच बऱ्याच बँका ग्राहकांच्या क्रेडिट कार्डाची मर्यादा कमी करत आहेत. एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, अ‍ॅक्सिस बँकेच्या अंतर्गत मेमोमध्ये असे म्हटले आहे की सुमारे दोन लाख ग्राहकांची पत मर्यादा घटवण्यात आली आहे, 15 एप्रिलपासून ही मर्यादा कमी करण्यात आली असून अ‍ॅक्सिस बँकेच्या काही ग्राहकांनी याची पुष्टी केली. या गटासाठी पत मर्यादा 30-90% ने कमी केली आहे.

पत मर्यादेत 90 टक्क्यांनी कपात

अ‍ॅक्सिस बँकेच्या एका ग्राहकाने एका वृत्तपत्रास सांगितले की त्यांच्या अ‍ॅक्सिस बँक विस्तारा कार्डावरील पत मर्यादा पाच लाखांवरून कमी करत केवळ 50,000 रुपये करण्यात आली आहे, ते थकबाकी वेळेवर भरत असूनही असे करण्यात आले आहे. ग्राहक सेवेत विचारणा केली असता असे सांगितले गेले की तांत्रिक अडचणीमुळे हे घडले आहे आणि काही दिवसात ते सुधारले जाईल. दुसर्‍या ग्राहकाने सांगितले की, त्याची मर्यादा सात लाखांवरून दीड लाख रुपये करण्यात आली आहे.

कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष (ग्राहक मालमत्ता) अंबुज चंदना म्हणतात की सध्याच्या परिस्थितीत काही विशेष कारवाई झाली असेल असे नाही. क्रेडिट कार्ड खर्च आणि परतफेडनुसार आम्ही ग्राहकांच्या क्रेडिट मर्यादेचा निर्णय घेतो आणि काही बाबतीत त्यात वाढ किंवा घट होते.

गेल्या महिन्यात क्रेडिट कार्डची शिल्लक बरीच वाढली

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीच्या शेवटी क्रेडिट कार्डवरील थकबाकीची रक्कम 1.1 लाख कोटी रुपये इतकी होती. जानेवारीअखेर देशात 5.6 कोटी पेक्षा जास्त सक्रिय क्रेडिट कार्ड होते. एचडीएफसी बँकेने वैयक्तिक कर्जासाठी पात्रता अट कठीण केली आहे आणि मर्यादा देखील कमी केली आहे. आता या बँकेची मर्यादा अर्जदाराच्या वार्षिक पगाराच्या 70-80% पर्यंत कमी केली गेली आहे, तर आधी ती 100% होती.

या किरकोळ विक्रेत्यांनाच बँका देत आहेत कर्ज

बँका किरकोळ विक्रेते आणि व्यापारी एंटरप्राइझ ओव्हरड्राफ्टसाठी कर्ज कमी करत आहेत. एचडीएफसी बँकेच्या अंतर्गत पत्रकात शाखा व्यवस्थापकांना असे आदेश देण्यात आले आहेत की पुढील आदेश येईपर्यंत केवळ किराणा दुकान, फार्मसी आणि दुग्धशाळांनाच कर्ज दिले जावे.