25,000 रुपयांपर्यंत सॅलरीवाल्यांसाठी खुशखबर ! अगदी मोफत मिळतील ‘या’ सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : जर तुम्हाला महिन्याची सॅलरी केवळ 25,000 रुपयांपर्यंतच मिळत असेल तर नाराज होऊ नका. तुम्हाला केवळ 25 रुपयांच्या अंशदानावर सरकार शिक्षण, औषधे आणि विवाहासह 19 प्रकारच्या सुविधा देईल. इतके कमी वेतन असणार्‍यांसाठी सरकारने मदतीसाठी काही तरतूदी केल्या आहेत, परंतु त्याची माहिती नसल्याने अनेकजण लाभ घेऊ शकत नाहीत. अनेक राज्यात अशाप्रकारच्या सुविधा आहेत. आज आम्ही हरयाणाच्या अशा योजनेची माहिती देत आहोत.

यामध्ये प्रत्येक महिन्याला कमाल 75 रुपये सरकारच्या वेलफेयर फंडात जमा करावे लागतात. ज्यामध्ये 25 रुपये वर्करच्या सॅलरीतून कापले जातात आणि 50 रुपये कंपनी व्यवस्थापनाकडून घेतले जातात. प्रत्येक फॅक्टरीच्या गेटवर याचा बोर्ड लावणे अनिवार्य आहे. ही स्कीम तुमच्यासाठी खुप कामाची आहे. जर कुणी महिला मजूर असेल आणि तिला लग्न करायचे असेल तर 51000 रुपये मिळतात. जर मजूराच्या मुली असतील तर तीन मुलींच्या लग्नासाठी 51-51 हजार रुपयांची मदत मिळते. हे पैसे लग्नाच्या तिन महिने अगोदर दिले जातील.

शिक्षणासाठी सुद्धा मदत
जर एखाद्या मजूराची मुले-मुली 12 पर्यंत शिकत असतील, तर त्यासाठी त्यांना स्कूल ड्रेस, वह्या-पुस्तके इत्यादी खरेदी करण्यासाठी दरवर्षी 3000 ते 4000 रुपयांची मदत मिळेल. ही सुविधा दोन मुले आणि तीन मुलींसाठी उपलब्ध आहे.

शिष्यवृत्ती
ही सुविधा प्रत्येक मजूराच्या तीन मुली आणि दोन मुलांसाठी आहे. 9 वी पासून इतर वर्गाच्या शिक्षणासाठी 5000 पासून 16000 रुपयांपर्यंत मिळतात.

* मजूरांच्या मुलांना कल्चरल स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी 2000 ते 31000 रुपयांपर्यंत दिले जातात.

* मजूराच्या मुलांना खेळासाठी स्पर्धेच्या आधारावर 2000 ते 31000 रुपये दिले जातात.

औषधांसाठी मदत

* महिला मजूरांसाठी तसेच मजूरांच्या पत्नींसाठी डिलिव्हरीसाठी 10-10 हजार रुपये. दोन वेळा दिले जातील.

* मजूरांना चष्म्यासाठी 1500 रुपयांची मदत.

* मजूरांना काम करताना अपघात झाल्यास किंवा अन्य कारणामुळे अपंगत्व आल्यास 1.5 लाख रुपयांची मदत.

* मजूर आणि त्याच्यावर अवलंबून असणार्‍यांना डेंटल केयर तसेच कवळी लावण्यासाठी 4 ते 10 हजार रुपयांची मदत.

* मजूर आणि त्याच्यावर अवलंबून असणार्‍यांना कोणत्याही दुर्घटनेत अपंगत्व आल्यास कृत्रिम अवयवासाठी आर्थिक मदत मिळते. परंतु सॅलरी 20 हजार रुपये असावी.

* ऐकण्याची समस्या असणार्‍या श्रमिकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी श्रवण मशीनसाठी 5000 (पाच वर्षातून एकदा)

* मजूरांच्या दिव्यांग मुलांसाठी 20,000 ते 30,000 रुपये. या अंतर्गत सर्व्हिस आणि वेतन मर्यादा ठरलेली नाही.

* दिव्यांग मजूर आणि त्यांच्या कुटुंबियातील दिव्यांग सदस्याला तिनचाकी सायकलसाठी 7000 रुपये.

अन्य सुविधांसाठी मदत

* महिन्याला 18,000 रुपये वेतन घेणार्‍या मजूरांना प्रत्येक पाच वर्षात सायकल खरेदी करण्यासाठी 3000 रुपये, परंतु सर्व्हिस किमान 2 झालेली असावी.

* महिला मजूरांना नव्या शिलाई मशीनसाठी प्रत्येक पाचवर्षांनी एकदा 3500 रुपये देण्याची तरतूद आहे.

* पाच वर्षांच्या सर्व्हिसवर 1500 रुपये एलटीसी (लिव्ह ट्रायव्हल कन्सेशन) ची सुविधा.

संकटकाळात कुटुंबाला मदत
कामाच्या ठिकाणी काम करताना मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 5 लाख रूपयांची मदत दिली जाईल. जर अन्य कारणाने मृत्यू झाल्यास विधवा किंवा अवलंबून असणारांना 2,00,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. मजूराचा कामाच्या ठिकाणी किंवा बाहेर कुठेही कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी 15000 रुपये देण्याची तरतूद आहे.