शेतकर्‍यांनी 30 नोव्हेंपर्यंत हे काम पूर्ण केलं नाही तर मिळणार नाही 3000 रूपयांचा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पुढील हफ्ता मिळण्यासाठी आधार कार्ड जोडण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तुमच्या खात्याला आधार कार्ड जोडण्याची मुदत केंद्र सरकारने 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे. त्याचबरोबर जम्मू-कश्मीर, लडाख, आसाम आणि मेघालय मधील शेतकरी मार्च 2020 पर्यंत आधार कार्ड जोडू शकतात.

या योजनेअंतर्गत देशभरातील 17,84,341  शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये जम्मू काश्मीरमधील 195 आणि मेघालायमधील केवळ 8 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या योजेनसाठी सर्व शेतकऱ्यांना आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले असून या चार राज्यांतील शेतकऱ्यांना विशेष सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मार्च 2020 पर्यंत हे शेतकरी आधार कार्ड जमा करू शकतात.

पैसे बुडणार नाहीत
कुणी शेतकरी हि योजना मध्येच सोडून गेला तरी टायचे पैसे बुडणार नाहीत. यामधून बाहेर पडेपर्यंत जितके पैसे त्याच्या खात्यावर जमा आहेत त्याच्यावर त्याला व्याज मिळत राहणार आहे. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही या योजनेत नाव नोंदवले नसेल तर कॉमन सर्विस सेंटरमध्ये जाऊन तुमचे नाव नोंदवू शकता.

एलआयसी करणार नियोजन
1) यासाठी लागणाऱ्या निधीचे नियोजन एलआयसी करणार आहे.
2) त्याचबरोबर मोदी सरकार देखील यामध्ये समान हिस्सा देणार आहे.
3) जर या योजनेतील शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर यामधील एका व्यक्तीला 50 टक्के रक्कम मिळणार आहे. 3000 रुपयांच्या पन्नास टक्के म्हणजेच 1500 रुपये रक्कम तुम्हाला मिळणार आहे.

किती हफ्ता द्यावा लागणार

या योजनेअंतर्गत 60 वर्ष वयानंतर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेत 12 कोटी शेतकरी असून त्यांच्या वय सध्या18 ते 40 वर्ष त्यांचे वय आहे. वयोमानानुसार  तुम्हाला महिन्याला 55 रुपये ते 200 रुपये हफ्ता भरावा लागणार आहे.

visit : policenama.com