लवकरच बंद होतेय ‘ही’ बँक, तुमचं अकाऊंट असेल तर तात्काळ पैसे काढा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयडिया पेमेंट बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. कारण आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक लवकरच आपला व्यवसाय गुंडाळणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी म्हटले आहे की कंपनीने आपला व्यवसाय बंद करण्यासाठी स्वतःच्या मर्जीने अर्ज केल्यानंतर लिक्विडेशनला मान्यता दिली आहे. रिझर्व्ह बँकेने मुंबई हायकोर्टाने डेलॉयट टूश तोमात्सु इंडिया एलएलपीचे वरिष्ठ संचालक विजयकुमार व्ही. अय्यर यांना यासाठी लिक्विडेटर म्हणून नियुक्त केले आहे.
या वर्षाच्या जुलैच्या सुरुवातीस, आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेने आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली. काही कारणांमुळे हा व्यवसाय’ अव्यवहारिक असल्याचे कंपनीने म्हटले होते.
एप्रिल 2016 मध्ये आयडिया सेल्युलरने सहाय्यक आयडिया मोबाइल कॉमर्स सर्व्हिसेस पेमेंट बँकेत विलीन केली आणि त्यास आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक असे नाव दिले. आता ही पेमेंट बँक बंद झाल्यानंतर केवळ एअरटेल, पेटीएम, जिओ, इंडिया पोस्ट या प्रमुख कंपन्यांची पेमेंट बँक सेवा उपलब्ध होईल.
आतापर्यंत पेमेंट बँकिंग मार्केटमधील चार कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे. आयटीएफसी बँक लिमिटेड आणि टेलिनोर फायनान्शियल सर्व्हिसेसच्या युतीमध्ये तयार झालेल्या पेमेंट बँक टेक महिंद्रा, चोलामंडल इनव्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी आणि दिलीप शांघवी यांनी आधीच व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे.
20 जुलै 2019 रोजी बँकेने आपल्या ग्राहकांना सांगितले होते की, जे लोक पेमेंट बँकेचे ग्राहक आहेत, त्यांनी शिल्लक लवकरात लवकर हस्तांतरित करा.
आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक 17 महिन्यांपूर्वी एप्रिल 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही पेमेंट बँक आदित्य बिर्ला नुवो आणि आयडिया सेल्युलर यांच्यात संयुक्त उपक्रम आहे. त्यात आदित्य बिर्ला नुवो यांचा 51 टक्के हिस्सा आहे. ऑगस्ट 2015 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून पेमेंट बँकेसाठी परवाना मिळाला होता.
Visit : Policenama.com
- ‘या’ व्यायाम प्रकाराने लाभते दिर्घायुष्य, जाणून घ्या 5 आरोग्यदायी फायदे
- सतत ‘एनर्जी ड्रिंक’ घेतल्याने कमी होते मेंदूची कार्यक्षमता, ‘या’ 3 गोष्टी लक्षात ठेवा
- हिवाळ्यात ‘हे’ 6 आजार ठरू शकतात त्रासदायक, ‘हे’ उपाय आवश्य करा
- योगासने सुरु करण्यापूर्वी आणि नंतर ‘ही’ काळजी घ्या, लक्षात ठेवा ‘या’ 6 गोष्टी
- ‘हे’ आहेत थंड पाण्याचे 5 दुष्परिणाम आणि गरम पाण्याचे तब्बल 14 फायदे
- गुलाबी थंडीत असे सांभाळा तुमचे आरोग्य, ‘हे’ 7 पदार्थ आवश्य सेवन करा
- वजन घटवण्यासाठी ‘या’ 7 टिप्स, केवळ दररोज चालण्याने जळतील 500 कॅलरीज !