कोट्यावधी पॉलिसीधारकांना मोठा झटका ! ‘या’ कारणामुळं जवळपास दुप्पट होऊ शकतो विम्याचा हप्ता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही महिन्यात वीम्याचे क्लेम वाढले आहेत, हे पाहता वीमा कंपन्या टर्म इंश्युरन्सचा प्रीमियम वाढवू शकतात. इंश्युरन्स कंपन्यांनी प्रीमियम वाढवल्याने जीवन वीमा कंपन्यांद्वारे 20 ते 40 टक्के प्रीमियम वाढ होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात जीवन वीमा कंपन्यांनी टर्म लाईफ प्लानच्या प्रीमियममध्ये 20 टक्के वाढ केली आहे. पॉलिसी डॉटकॉमचे सीईओ आणि संस्थापक नवल गोयल यांनी सांगितले की, मागील काही महिन्यांमध्ये इंश्युरन्स क्लेममध्ये खुप मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे क्लेम सेटलमेंटची संख्या सुद्धा वाढली होती. परंतु, क्लेमच्या संख्येत इतकी वाढ होईल याचा अंदाज कंपन्यांना नव्हता.

नाईलाजाने प्रीमियम वाढला जाऊ शकतो
रिइंश्युरन्स कंपन्यांनी आपला प्रीमियम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे इंश्युरन्स कंपन्यांना सुद्धा नाईलाजाने प्रीमियम वाढवावा लागला. परंतु, अजूनही काही कंपन्यांनी प्रीमियम वाढवण्याचा निर्णय घेतलेला नाही. कारण या कंपन्या आपल्या ग्राहकांच्या संख्येचा अभ्यास करत आहेत.

इंश्युरन्स कंपन्यांचा प्रीमियम मृत्यूदर, किती क्लेमचा दावा केला जाऊ शकतो, संबंधित क्लेमच्या बदल्यात कंपनी किती प्रीमियम वसूल करत आहे, या गोष्टींवर अवलंबून आहे. ज्यामुळे येणार्‍या काळात यामध्ये आणखी तेजी होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर इंश्युरन्स कंपन्यांना पुन्हा प्रीमियम वाढविण्याचे पाऊल उचलावे लागू शकते.

20 ते 25 टक्के किंमतीत वाढ होण्याची शक्यता
पॉलिसी बाजार डॉट कॉमचे मुख्य बिझनेस ऑफिसर संतोष अगरवाल यांनी म्हटले की, टर्म इंश्युरन्सची किंमत 40 टक्के वाढली आहे. मागच्या महिन्यात काही वीमा कंपन्यांनी टर्म इंश्युरन्सच्या प्रीमियममध्ये 20 टक्क्यांची वाढ केली आहे. ज्या कंपन्यांनी अजूनपर्यंत वाढ केलेली नाही, त्यांच्याकडून येणार्‍या 3 ते 6 महिन्यांत 20 ते 25 टक्के किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.