Paytm च्या वापरकर्त्यांना मोठा झटका ! पेटीएम बँकेच्या ‘या’ निर्णयामुळं ग्राहकांचं होणार मोठं नुकसान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही पेटीएम वापरता असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. पेटीएमने आपल्या ग्राहकांना एक झटका दिला असून बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात मोठी कपात केली आहे. त्यामुळे आता पेटीएमच्या बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजमध्ये पन्नास टक्के कपात केली असून यापुढे केवळ 3.5 टक्के व्याजदर मिळणार आहे. यासंबंधी पेटीएम बँकेच्या वतीने एक पत्रक जारी करण्यात आले असून 1 नोव्हेंबरपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. त्याचबरोबर बँकेने आपल्या नवीन एफडी योजनेची देखील घोषणा केली आहे.
SBI ने देखील कमी केले आहेत तर
नुकतेच देशातील सर्वात मोठी बँक असलेली SBI ने देखील आपल्या बचत खात्यावरील व्याजदरांमध्ये कपात केली असून 1 लाख रुपयांपर्यंत रकमेवर यापुढे केवळ 3.25 टक्के व्याज मिळणार आहे. त्यानंतर आता पेटीएमने देखील आपल्या ग्राहकांना देखील झटका दिला आहे.
पेटीएमच्या एफडीवर मिळणार 7.5 टक्के व्याजदर
बँकेचे एमडी सतीश कुमार गुप्ता यांनी याविषयी बोलताना सांगितले कि,नुकतेच रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरांमध्ये कपात केली आहे. त्यामुळे पेटीएमने देखील आपल्या व्याजदरांमध्ये कपात केली आहे. त्याचबरोबर पेटीएम 1 रुपयांमध्ये आपल्या ग्राहकांना एफडी खाते खोलण्याची संधी देत असून त्यावर 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे.
visit : Policenama.com
- रूबाबदार व्यक्तीमत्वासाठी पुरूषांनी फॉलो करावा ‘हा’ पारंपारिक ‘फॉर्मूला’
- पुरूषांनी ‘या’ १० गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास बिघडू शकते आरोग्य, अशी घ्या काळजी
- ‘सेक्स पॉवर’ वाढविण्यासाठी पुरूषांनी ‘हे’ सेवन करावे, अशी आहे पद्धत
- सावधान ! जेवणानंतर थंड पाणी पिताय का ? रोग प्रतिकारकशक्ती होते कमी
- ‘या’ व्यायामाने कर्करोग रूग्णांच्या आयुष्यामानात होतो सकारात्मक बदल
- अशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत
- तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी करा ‘हे’ खास घरगुती उपाय, जाणून घ्या
- ‘या’ सेक्ससंबंधीच्या समस्यांपासून ‘कंडोम’ देखील वाचवू शकत नाही, जाणून घ्या
- ‘हे’ व्यायाम प्रकार करा आणि पळवून लावा ‘गुडघेदुखी’ ! जाणून घ्या