Paytm युजर्ससाठी मोठी बातमी ! कंपनीनं OTP शी संबंधित सांगितलं एक ‘गुपित’, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   जर तुम्हीही कोरोना काळात कॅशलेस झाला असाल आणि पेटीएम (Paytm) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. ऑनलाईन पेमेंट सुरक्षित करण्यासाठी पेटीएमने आपले यूजर एसएमएस इंटरफेस तयार करताना बर्‍याच गोष्टींची काळजी घेतली आहे. ज्यामुळे पेटीएमने होणाऱ्या फसवणूकीची भीती कमी होते. जर आपण पेटीएम वापरत असाल तर तुमच्या लक्षात आले असेल की पेटीएम आपल्या ओटीपीला नेहमी संदेशाच्या शेवटी ठेवतो.

पेटीएमने असे का केले आहे?

याबाबत कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी एका ट्वीटला उत्तर देताना समजावले की, सहा अंकी ओटीपी व्यवहारादरम्यान एसएमएसच्या अगदी शेवटी का असतो. आपण देखील अशा ग्राहकांमध्ये आहात ज्यांना या फीचरचे गूढ समजले नाही तर ते म्हणजे हा कोणताही तांत्रिक पेच नसून जाणूनबुजून टाकलेले वैशिष्ट्य आहे. ट्विटरवर इंस्टाहायर संस्थापक आदित्य राजगडिया यांना उत्तर देताना 41 वर्षीय उद्योजकांनी उघड केले की फसवणूक करणाऱ्यांना निराश करण्यासाठी हे जाणीवपूर्वक टाकलेले पाऊल आहे.

राजगडिया म्हणाले होते की संदेशाच्या शेवटी ओटीपी दिसतो. यामुळे युजरला संदेश उघडावा लागतो. त्यांनी असे देखील म्हटले की वापरकर्त्यासाठी संदेशाच्या नोटिफिकेशनमधून ओटीपीला कॉपी करणे सोपे होते जर हे पहिल्या काही शब्दांत दिसत असेल. याला शेखर यांनी उत्तर दिले. त्यांनी ट्विटरवर उत्तर देताना लिहिले की, असे आढळून आले आहे की फसवणूक करणारे ग्राहकांना ओटीपी सहजपणे सामायिक करण्यास प्रवृत्त करतात. आम्ही यास चेतावणी संदेशाच्या शेवटी ठेवले आहे जेणेकरून ग्राहक ओटीपी सामायिक करण्यापूर्वी ते वाचू शकतील. विजय शेखर म्हणाले की हे पाऊल उचलल्यानंतर ओटीपी शेअरिंगच्या घटनांमध्ये घट झाली आहे.